loader
Breaking News
Breaking News
Foto

सुर्याजी पिसाळाची वृत्ती असलेल्या वामन बदे यांनी शेलारमामा असल्याचा आव आणू नये - सुनिल तळेकर

सुर्याजी पिसाळाची वृत्ती असलेल्या वामन बदे यांनी शेलारमामा असल्याचा आव आणू नये आसा सणसणीत टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी वामन बदे यांना लगावला असून बदे यांचे स्टेटमेंट म्हणजे वांजत्री वाल्याने पार पाडलेली भुमिका असल्याचे सांगत पाटील गट असल्या वक्तव्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही असे देखील तळेकर यांनी स्पष्ट केले आहे .मध्यंतरी सारखाच विकासकामांच्या श्रेयवादासाठी पाटील व शिंदे गटात वाकयुद्धाचा दुसरा अंक सुरु झाला असून एकमेकांवर प्रसिद्धी माध्यमाद्वारे तोफा डागण्यात येत आहे.आगामी जिल्हापरिषद पंचायत व नंगर पंचायत निवडणूक तोंडावर असताना या वाकयुध्दा मुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.काल माजी आमदार नारायण पाटील यांनी थेट आ. संजयमामा शिंदे यांच्या वर हल्लाबोल केल्यानंतर आज शिंदे गटाकडून वामन बदे यांनी त्या टिकेस उत्तर दिले. यावर आज पाटील गटाकडून परत एकदा हल्लाबोल करण्यात आला. याबाबत बोलताना प्रवक्ते तळेकर म्हणाले की आदिनाथ कारखान्याचा इतिहास व आजची स्थिती पाहता तत्कालीन चेअरमन वामन बदे हे आदिनाथच्या आजच्या अवस्थेस कारणीभूत असा सिंहाचा वाटा उचलतील. तत्कालीन आमदार तथा माजी राज्यमंत्री दिगंबर (मामा) बागल यांनी फेकलेल्या चेअरमनपदाच्या तुकड्यावर आर्थिक स्थिती सुधारुन घेणार्‍या वामन बदे यांनी दिगंबरमामा बागल यांच्या निधनानंतर या गटास सोडचिठ्ठी देऊन विश्वासघात केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शिवकालीन इतिहासातील सुर्याजी पिसाळांची आठवण करुन देणारे वामन बदे आज शिंदे गटात शेलार मामा असल्याचा आव आणत आहेत. निमगावकरांच्या दावणीत पडून राहण्यापेक्षा अधिक काम आता उरले नाही.वामन बदे हे शिंदे गटात जेष्ठ नेतृत्व असल्याने त्यांचा बातमी पुरता तरी वापर केला जावे यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही असा मार्मिक टोला देखील तळेकर यांनी लगावला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

उमरड मधील बंद पडलेली पाणी वापर संस्था व पाईपलाईन, उमरड-झरे मार्गावर एका वस्तीपर्यंत रस्तादुरुस्ती दाखवून प्रत्यक्षात मात्र एक गायब झालेला रस्ता, आदिनाथ कारखान्यातील भ्रष्टाचार या प्रकरणांची राख फूंकून परत एकदा विस्तव वर आणता येईल. स्व. बागल आमदार असताना दर पंचवार्षिक निवडणुकी अगोदर वामन बदे हेच गुडघ्याला बाशिंग बांधून असायचे. एकदा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावीच. तीस वर्षाच्या संघर्षातून व केलेल्या अविरत जनसेवेतून नारायण पाटील यांचे नेतृत्व लोकांच्या पसंतीस पात्र झाले. धनशक्तीचा पराभव करुन नारायण पाटील हे आमदार झाले.यामुळे वामन बदे हे काय म्हणतात याचा परिणाम करमाळा तालुक्यातील जनतेवर कधीच होणार नाही. आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणुक केली व शेतकऱ्याची संमती नसताना खोटी कागदपत्रे वापरुन कर्जे काढली.शेतकर्‍यांच्या वर अन्याय होत असताना वामन बदे धृतराष्ट्र असल्याप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून होते. कदाचित बदे यांनीच हा सल्ला आ. शिंदे यांना दिला असावा. कोण कोणत्या संघात आहेत याबद्दल शिंदे गटानेच चिंतन करावे कारण जिल्हापातळीवर आ. संजय शिंदे यांना किती किंमत आहे हे पंढरपुर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजून आले. आ. शिंदे हे स्वयंघोषित असे जिल्हा नेतृत्व असुन अगोदर त्यांनी कोणत्याही एका पक्षात प्रवेश करावा. आ. शिंदे यांच्या पेक्षा करमाळा तालुक्यातील जनतेने वीस हजारांचे मताधिक्य नारायण पाटील यांना दिले असून आजही जनतेच्या संघाचे कर्णधार नारायण पाटील हेच आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत जनताच वामन बदे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देईल. पाटील गट असल्या टिकेस भीक घालत नसल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पाटील गटाकडून केलेल्या या टिकेस आत्ता शिंदे गट उत्तर देतो की वादावर पडदा पडतो याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts