loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढेज येथे शिवजन्मोत्सव समिती गठीत , पारंपारिक पद्धतीने होणार सोहळा

कोंढेज ता करमाळा येथे शिवजयंती उत्सव साजरा करणे बाबत बैठक पार पडली या वेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी करून समिती गठीत करण्यात आली. या वेळेस गावातील ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी सर्वांनुमते शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी रेवननाथ आरणे तर उपाध्यक्षपदी अक्षय उंबरे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष पदी विक्रांत भोसले , सहकार्य अध्यक्षपदी अमोल जगताप ,तर सचिव पदी : धनंजय बादल , व सहसचिव आकाश लोंढे , शिवजयंती उत्सव प्रमुख म्हणून सुभाष इंगोले अशा या निवडी करण्यात आल्या.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पदाधिकारी तन-मन-धनाने काम करतात मंडळाच्यावतीने लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती लेझीम पथक हा खेळ गावातील तरुण पिढी ला शिकवला जात आहे, ७ ताखेपासून ते १९ तारखे पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत भैरवनाथ मंदिरात ढोल ताशांच्या गजरात लेझिम सराव होणार आहे ..

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

घराघरात शिवजन्मोत्सव साजरा करण्या साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . 19 फेब्रुवारी या दिवशी गावात महाराजांच्या पूजेची सजावट घरोघरी केली जाते. व शिवजयंती कमिटीच्या वतीने यांच्या मधून पाहिले ३ नंबर काढले जातात.यासाठी प्रथम बक्षीस : ११११, द्वितीय बक्षीस : ७७७ तृतीय बक्षीस : ५५५तसेच सहभाग दर्शवणाऱ्या शिवप्रेमींना पुस्तक देऊन सत्कार केला जाणार असल्याचे समिती च्या वतीने सांगण्यात आले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts