loader
Breaking News
Breaking News
Foto

विकास कामांच्या बाबतीत संजयमामांबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही. माजी जिल्हापरिषद सदस्य बदे यांची मा .आ पाटील यांच्यावर टिका

विकासकामे करण्यात आऊट झाल्यामुळेच तुम्हाला मतदारसंघातील जनतेने आऊट केले आहे ,विकास कामांच्या बाबतीत संजयमामांबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही.अशी टिका माजी जिल्हापरिषद सदस्य वामनदादा बदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काल माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजय शिंदे यांच्यावर सडकून टिका करताना म्हटले होते की, आमदार शिंदे हे मि मंजूर केलेल्या कांमाचे उद्घघाटन करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र शिंदे यांच्या या खोटारड्या पणास तालुक्यातील जनता ओळखुन आहे त्यांच्या खोट्या श्रेयास कधीच यश येणार नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना बदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी आमदार पाटील यांच्यावर खरमरीत टिका करत म्हटले आहे की,तालुका सोडा ज्यांना स्वतःच्या गावातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत आउट केले, नारायण पाटील यांनी जिथून तालुक्याच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्या जेऊर ग्रामपंचायतीने त्यांना आउट केले.तालुक्याच्या राजकारणात प्रथम पक्षाने आऊट केले नंतर जनतेने आऊट केले .असे वारंवार आऊट झाल्यामुळे ज्यांना क्रिकेट संघामध्ये 11 खेळाडू तर सोडा साधा राखीव खेळाडू म्हणूनही संधी न मिळता थेट प्रेक्षकांत बसावे लागले आहे. अशा माजी नेत्याने हास्यास्पद वक्तव्य थांबवावे आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्या विकास कामांकडे डोळसपणे पहावे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की , आमदार संजयमामा शिंदे यांनी मारलेले विकास कामांचे षटकार वारंवार पाहण्याची सवय आता आपल्याला ठेवावी लागेल कारण आता आपण संघातही नाही आहात व राखीवही नाही तर प्रेषकाच्या भूमिकेत आहात. फक्त टाळ्या वाजवा ,नाही रूचले तर किमान थयथयाट करू नका हा आमचा प्रामाणीक सल्ला आहे . संजयमामा मतदार संघाबरोबर जिल्ह्याच नेत्तृत्व करतात आगामी काळात ते राज्यातील संघात दिसणार आहेत, ते सोसण्याची तयारी ठेवा .याउलट ज्या जेऊर संघातून तालुक्याच्या संघात लॉटरी रुपाने का होईना आपली वर्णी लागली होती, त्यात आपण फक्त वाळूरूपी मानधनावरच लक्ष दिले . त्या जेऊरच्या संघाला आता आपली कोच म्हणून देखील आवश्यकता राहीली नाही. तेथील बहुसंख्यांकांबरोबरच अल्पसंख्यांक व व्यापारी वर्गाबरोबरच सामान्य जनता उघडपणे मामांच्या विकास रथाला दाद देवू लागली आहे . इतकच काय आपले लव्हे गावात पाणी देखील मामांनी आणले त्याचे आपण लाभार्थी आहात . विकास कामांच्या बाबतीत संजयमामांबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही. कारण ज्याप्रमाणे क्रिकेट मधील सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत, तसे संजयमामा हे राजकारणातील विकासरत्न आहेत हे रोडकिंग अथवा पाणीदार सारखे स्वयंघोषित लेबल नाही तर इथे काम बोलते व कृती दिसते असा घणाघात वामनदादा बदे यांनी केला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts