येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशवंत परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. घुमरे सरांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक- 01/02 /2022 रोजी मा. प्राचार्य प्रसिद्ध कवी डॉ. सुरेश शिंदे यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक, प्रा. प्रदीप मोहिते , कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी हजर होते.
या वाढदिवसाच्या निमित्त दिनांक 04/02 /2022 रोजी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी कुर्डूवाडी येथील रक्तपेढीने सहकार्य केले . या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळ्यातील प्रसिद्ध डॉ. रोहन जाधव-पाटील , उद्योजक विक्रांत घुमरे , विश्वस्त व उद्योजक आशुतोष घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ. विजय गायकवाड, प्रबंधक कैलास देशमुख, दादा श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव जाधव , सचिव काका काकडे , एनसीसीचे विद्यार्थी व एनसीसीचे विद्यार्थी व यशवंत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते . या रक्तदान शिबिरामध्ये 107 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले . यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अनिल साळुंखे यांनी मानले . दिनांक 05 /02/2022 रोजी मा.विलासरावजी घुमरे यांच्या 67 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना अंडी व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील , प्रबंधक कैलास देशमुख , प्रा.प्रमोद शेटे कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
O6/O2/2O22 रोजी मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या 67 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , विश्वस्त व उद्योजक आशुतोष घुमरे , संस्थेचे खजिनदार गुलाबराव बागल, विश्वस्त तात्यासाहेब मस्कर, उपप्राचार्य संभाजी किर्दाक व यशवंत परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'विजयश्री ' या निवासस्थानी विलासराव घुमरे सर व सौ. जयश्रीताई घुमरे यांचा सपत्नीक सत्कार विलासराव घुमरे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाटोळे, सचिव राजेंद्र साळुंखे व सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते , सर्व पिग्मी एजंट उपस्थित होते. त्याचबरोबर दिगंबररावजी बागल पेट्रोलियम चे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाला . या वेळी वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मा .विलासरावजी घुमरे सरांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या . त्यानंतर दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये मा.विलासरावजी घुमरे सर यांचा यशवंत परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई बदलापूर येथील उद्योजक मा. पंढरीनाथ साटपे, ठाण्याचे कस्टम अधिकारी मा.पवार साहेब ,संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , संस्थेचे खजिनदार गुलाबराव बागल, मा. विक्रांत घुमरे , उपप्राचार्य संभाजी किर्दाक, डॉ. भोसले बदलापूर , चिरंजीव राणा घुमरे व प्रबंधक कैलास देशमुख उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.