loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शिंदे यांच्या या खोट्या श्रेयवादास कधीच यश मिळणार नाही- माजी आमदार पाटील यांची टिका

मी केलेल्या विकासकायांचे श्रेय घेण्यासाठी आ. संजय शिंदे यांची चाललेली केविलवाणी धडपड जनता ओळखुन आहे,यामुळे आमदार शिंदे यांच्या या खोट्या श्रेयवादास कधीच यश मिळणार नाही असा हल्लाबोल आज माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात मा. आ. नारायण पाटील यांनी म्हटले की करमाळा मतदार संघातील करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विकासाबाबतची कामे हि माझ्या कालावधीतच मंजूर झाली तर काही कामे प्रस्तावित होऊन मंजुरीच्या अंतिम टप्प्यात होती. माझ्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांवरुन 100 खाटांची मंजुरी, येथील वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी नवीन इमारत बांधणे, या रुग्णालयात असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या त्रुटी भरुन काढणे, नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणे आदि सर्व कायांसाठी मी पाठपुरावा केला व यातील बहुतांश कामे करुन घेतली. परंतु आज या कामांचे खोटे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न विद्यमान आमदार संजय शिंदे करत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कुर्डूवाडी येथील ट्रामा केअर हॉस्पिटल साठी मी मागणी केली. मागणी पासुन ते मंजूरी पर्यंत सतत पाठपुरावा केला. हे काम प्रस्तावित होत असताना जिल्ह्यातील तत्कालीन एका वरीष्ठ नेत्यांनी कुर्डूवाडी येथील ट्रामा केअरचे स्थळ बदलून हे इतर तालूक्यात नेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यास पुर्ण विरोध करत व सतत पाठपुरावा करत मी सदर ट्रामा केअर हे कुर्डुवाडी येथेच ठेवण्यात यश मिळविले..वास्तविक पाहता आमदार संजय शिंदे हे सध्या एक तर माझ्या कालावधीतील कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत असुन कार्यालयीन कामकाजांचेही श्रेय मिळवण्यासाठी सदर कामे स्वःताच्या प्रयत्नामुळे झाली असा देखावा बातम्याद्वारे जनतेसमोर निर्माण करत आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजनेची सुप्रमा, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नियोजीत 100 खाटांचे नियोजन करताना अतिदक्षता व जनरल असे विभाजन केले जाणे, महावितरणच्या वीज बिल वसुलीतून सध्या तालूक्यात होत असलेली वीजेची कामे हि सर्व कामे संबंधित विभागास शासन जी आर आणि वरीष्ठ कार्यालयाद्वारे प्राप्त सुचना या आधारावरच होत असून सदर कामे हि होतच असतात.परंतू हे सर्व बाजूला सारुन विद्यमान आमदार मात्र सदर कामांचे श्रेय घेण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आवाटी येथील मंजुर वीज उपकेंद्रासाठीचा निधी आणि कोळगाव येथील बसविलेला फिडर हि कामे शेतकऱ्यांकडुन केलेल्या वीज बिल वसुलीमधुन होत असून यासाठी शासन व महावितरण यांचेकडून जी आर द्वारे एक नियमावली सुध्दा आखली गेली आहे व त्यानूसारच वीजेची कामे हौत आहेत. या कामांच्या उद्घाटनप्रसंगी मात्र आमदार शिंदे हे जणु आपल्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे सांगत शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत. कोळगाव येथील फिडर गेली दिड वर्षे झाली बंद होता. कोळगाव व परीसरातील सहा गावातील शेतकरी वीजेपासुन वंचीत होते. मग हे काम पुर्वीच महावितरणच्या इन्फा 2 मधून व्हावे यासाठी आ. शिंदेनी का प्रयत्न केले नाहीत? अठरा महिने हे काम का रखडले? महावितरणकडे जर निधी नसेल तर शासनाच्या तिजोरीतुन एक विषेश बाब म्हणुन का कामासाठी मागेच निधी का मिळवला नाही? अठरा महिने झाली सहा गावे मुबलक वीजेपासुन वंचित असताना हा प्रश्न तारांकीत करुन विधानसभा अधिवेशनात का मांडला नाही? करमाळा तालुक्यातील जनता व शेतकरी ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे जाणुन आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यामुळे आमदार शिंदे यांच्या या खोट्या श्रेयवादास कधीच यश मिळणार नाही असा दावाही माजी आमदार नारायण पाटील यांनी केला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts