नागपूर मधील जास्त बिल आकरण्याऱ्या हॉस्पिटल ला आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका">
loader
Breaking News
Breaking News
Foto

नागपूर मधील जास्त बिल आकरण्याऱ्या हॉस्पिटल ला आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून खासगी हॉस्पिटलना सूचना करण्यात आली होती. पण, नागपूरमधील काही हॉस्पिटलनी याही परिस्थितीत संधी साधल्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

नागपूरमध्ये कोरोनाच्या काळात खासगी हॉस्पिटल्सनी जास्त रक्कम आकारू नये, अशी सूचना प्रशासनाने केली होती. पण तरीही कोविड-19 ची बाधा झालेल्या रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली गेली. या प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरातील वोक्हार्ट आणि सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत.

जास्त आकरलेले बिल 2 दिवसात परत देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत

मुंबई प्रतिनिधी वैभव फरतडे

यासाठी या हॉस्पिटल्सना दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. जर संबंधित वेळेत रुग्णांची रक्कम रुग्णालय व्यवस्थापनाने परत केली नाही तर हॉस्पिटलविरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा कायदा,अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts