loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले घारगाव येथील सरवदे कुटुंब

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकाचे गाव म्हणजे घारगाव या गावात मुला-मुलींच्या प्राथमिक शिक्षणाची सोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होते. गुरुजन वर्ग तर शैक्षणिक ज्ञान देतात. मात्र हे होत असताना शाळेच्या भौतिक प्रगती व इतर शैक्षणिक साहित्यात भर पाडण्यासाठी शाळेतील शिक्षकांना गावातील दानशूर व देणगीदारांची गरज असते.अशी अनेक दानशूर कुटुंबे घारगावात आहेत व त्यांनी त्यांच्यामाध्यमातून देणग्या दिलेल्या आहेत. त्यापैकीच एक शिक्षणाची आवड गरज असलेले कुटुंब म्हणजे सरवदे कुटुंब होय.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सरवदे कुटुंब हे अनेकांच्या मदतीला धावणारं आणि गावातील कोणीही पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य ठेवणार कुटुंब आहे मा. संजय सरवदे साहेब व देविदास सरवदे साहेब आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजसेवेसाठी नेहमीच गावातील शैक्षणिक उपक्रमात खर्ची घालतात.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आज विद्यार्थ्यांवर आलेली कोरोना काळातील अतिशय गंभीर परिस्थिती पाहता यांनी आपल्या शाळेत गावच्या सरपंच सौ. लोचना पाटील यांच्या समवेत शाळेत जाऊन ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी शाळेतील मुलांना 100 मास्क दिले.याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व तब्बेतीची विचारपूस केली. त्यांच्यासमवेत रामहरी जाधवर मुख्याध्यापक खान सर बुधवंत सर कुलकर्णी सर पाटील मॅडम यादगीरे मॅडम उपस्थित होत्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या सर्व गुरुजनांनी शाळेला होत असलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. सरवदे परिवाराकडून अशीच जनसेवेची कामे होवोत ही अपेक्षा व्यक्त केली

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts