loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा बंद असल्याच्या वेळेत शिक्षिकेने कल्पकतेने रंगवल्या शाळेच्या भिंती ! गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कौतुक.

शाळा बंद आहेत पण शिक्षकांना शाळेत रोज येणे बंधनकारक आहे.मग दिवसभर बसून राहण्या पेक्षा ऑनलाइन अभ्यास दिल्यानंतर इतर वेळेत आपल्या कला गुणांना वाव देणाऱ्या शिक्षीका वैशाली रोकडे- रंदवे मॅडम यांनी शाळेतील भिंतीवर स्वखर्चाने व स्वतः हाताने चित्रे रेखाटुन वेगळा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना शाळा आपलीशी वाटावी, यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांनी थेट स्वतः हातामध्ये ब्रश घेत कल्पकतेने शाळा रंगवली. शाळेच्या भींवर चित्रे रंगवत, विद्यार्थ्यांना शिक्षण व आनंद मिळेल, अशी काळजी घेतली.आहे .वैशाली रंदवे मॅडम या मांगी येथील देशमाने वस्ती शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.मात्र कोरोना मुळे सर्वांची लाडकी शाळा अडचणीत आली ,गेल्या दोन ते अडीच वर्षा पासुन कोरोना मुळे शाळेचा लपंडाव सुरु आहे .ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षणा बरोबरच, मैदाणी खेळ बंद असल्याने शारीरिक विकास खुंटला आहे, बडबड गित, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा बंद आहेत, त्यामुळे बालचमुचा आनंद हिरावला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शाळा बंद असली तरी विद्यार्थी व शिक्षकांचे शाळे विषयीचे प्रेम आस्था मात्र कायम आहे .विद्यार्थी जसे शाळा सुरु होण्याचे वाट पहात आहेत, तसेच शिक्षक देखील मुलांच्या प्रत्यक्ष भेटी साठी अतुर आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांना आनंद वाटावा ,शाळेची पुन्हा एकदा गोडी लागावी यासाठी मांगी येथील देशमाने वस्तीवरील महिला शिक्षीका वैशाली रोकडे रंदवे मॅडम यांनी शाळेतील सर्व भिंतीवर स्वखर्चाने व स्वतः हाताने आकर्षक आशी प्राण्यांची चित्रे काढली आहेत. हि आकर्षक चित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पालक, शिक्षक यांच्याबरोबर गटविकास अधिकारी मनोज राऊत व गटशिक्षण अधिकारी राजाराम भोंग यांनी रंदवे मॅडम यांचे कौतुक केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

केंद्र प्रमुख संतोष पोतदार सर यांनी रंदवे मॅडम यांचे कौतुक करताना सांगीतले की रंदवे मॅडम यांनी स्वखर्चाने स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळा रंगकाम चित्र काम केलेले आहे . चित्र पाहून विदयार्थी आनंददायी पद्धतीने अध्ययन करत आहेत . त्यांच्या चित्रकलेच्या कौशल्यामुळे विदयार्थ्यानाही चित्रकलेची आवड निर्माण होत आहे . सदर शाळा द्विशिक्षकी असून त्यांना सहकारी दिप्ती जगताप मॅडम आहेत . त्या सुध्दा फलक लेखन , चित्रकला या मध्ये उत्कृष्ट आहे . दोन्ही आदर्श शिक्षीका आहेत .कोरोना कालावधी मध्येही पारावरची शाळा उपक्रमांतर्गत अध्यापन सुरु होते . शाळेची गुणवत्ता चांगली आहे .पालकांचे सहकार्य चांगले आहे . त्यांच्या कामकाजाबाबत सर्व पालक वर्ग , शाळा व्यवस्थापन समिती समाधानी आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts