loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमवार पासून पुन्हा होणार शाळा सुरु- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या ,मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर 10 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनाची तिव्रता कमी झाल्यानंतर 24 जानेवारीपासून अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या होत्या मात्र सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांकडून व पालकमंत्र्याकडुन शाळा सुरु करण्याचा निर्णय आठ दिवस लांबणीवर टाकण्यात आला होता.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दरम्यान शाळा सुरु करण्या बाबत पालकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात असलेल्या गावातील शाळा सुरु करण्या बाबत निर्णय घ्यावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रसताव सादर केला होता .या प्रस्तावावर शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी टास्क फोर्स चि बैठक संपन्न झाली असून दिनांक ७ फेब्रुवारी पासुन कोरोना नियमावलीचे पालन करून पहिली ते बारावी पर्यंत च्या शाळा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. या संदर्भाचे पत्र तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी व सर्व मुख्याध्यापक यांना देण्यात आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान शाळा सुरु करण्या पुर्वी विद्यार्थी, पालक यांच्यात जागृकता निर्माण करावी, सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले असावे,शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, शाळेच्या परिसरात स्वचछ्ता व आरोग्यदायक परस्थिती ठेवावी, पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक शक्यतो घेवु नये, प्रत्येक वर्गाचा कालावधी तिन ते चार तास असावा,जेवणाची सुट्टी नसेल, विद्यार्थी व शिक्षक यांनी मास्क चा वापर करावा आदि अटि घालून दिलेल्या आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts