loader
Breaking News
Breaking News
Foto

काळाशी आणि काळजाशी नाते जोडणारी कलाकृती म्हणजे 'कविता' - प्रा.गणेश करे-पाटील

कविता जगताना हा काव्यसंग्रह शब्दसंपत्तीचे आणि शब्दसंस्कृतीचे सुंदर अपत्य आहे,काळाशी आणि काळजाशी नाते जोडणारी कलाकृती म्हणजे कविता असते,असे मत प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.लिहिणा-या आम्ही महिला गृप च्या वतीने 'कविता जगताना' हा प्रातिनिधिक स्वरूपातल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांच्या हस्ते व मुंबईच्या मुख्याध्यापिका मा.विनया म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यानिमित्ताने ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा सारख्या भागात काही लिहिणा-या महिला वॉटस् आप गृप वर एकत्र येतात.निव्वळ टाईमपास न करता एका दर्जेदार पुस्तकांचं प्रकाशन करतात ही गोष्टच ज्ञानज्योती सावित्रीबाई़च्या विचारांना पुढे घेऊन जाणारी आहे.आणि या पुस्तकात तेरा जणींच्या कविता असून यातील कवितांची निवड ही कवयित्री संजीवनी राजगुरू यांनी केली तसेच मुखपृष्ठ संकल्पना गझलकार आर्किटेक्ट मितवा श्रीवास्तव यांनी केले तर पुस्तक संपादनाचं काम साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या साहित्यिका प्रा.अंजली श्रीवास्तव यांनी केले.म्हणून हा सोहळाच मला वाटतो की हा ऐतिहासिक सोहळा आहे असे मत यशकल्याणीचे प्रा.गणेश करे- पाटील यांनी व्यक्त केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी या़च्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. म्हात्रे ताई म्हणाल्या की मुळात महिला एकत्र येऊन असं समाजप्रबोधनाचे काम करु शकतात ही गोष्ट अभिनंदनीय आहे ‌तेरा साहित्यिक महिला एकत्र येऊन कविता जगतात,लिहीतात, संपादन करतात.ही गोष्ट खरच खूप काही शिकवून गेली.हा अनुभव लाख मोलाचा आहे..तसेच कविता जगताना या काव्य संग्रहास साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या मुंबई च्या विजया वाड यांनी शुभेच्छा देऊन. हे पुस्तक लाख मोलाचं केलं असेही मत अंजली श्रीवास्तव यांनी नोंदवले.लिहित्या हातांनी आता थांबायचं नाही.लवकरच आणखी एक पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे असे मत संजीवनी राजगुरू यांनी मांडले. शिक्षिका हेमा विद्वत,सुलभा खुळे ,सुजाता अनारसे, मंजू जोशी, विजयालक्ष्मी गोरे रत्नमाला होरणे,विनया घोलप, , अर्चना माने ,र्प्राची सरवदे, ऋतुजा वीर त्यांनी मनोगत व्यक्त केले.उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सुलभा खुळे यांनी केले. आभार मंजू जोशी यांनी मानलें.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

छोट्या बालचमूंना तसेच तेरा कवयित्रीना शितल करे-पाटील यांनी पुस्तके व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. शाल श्रीफळ ला फाटा देत पुस्तके भेट देऊन नव्या पिढीला वाचण्याची सवय लागावी हा करे-पाटील यांच्या विचारांचं कौतुक ही सर्व साहित्यिक महिलांनी केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts