loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळगाव येथे ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न मार्गी लावुन विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे आमदार संजयमामा गटात प्रवेश केल्याचे सार्थक - भरतभाऊ आवताडे

करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील बंद असलेल्या कोळगाव सबस्टेशन मधील 3:15 नवीन ट्रान्सफर बसवून त्याचे उद्घघाटन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करून या भागातील शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केल्याचे सार्थक झाल्याचे मत संजयमामा समर्थक फिसरे गावचे उद्योजक युवक नेते भरतभाऊ आवताडे यांनी व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून कोळगावचा ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना चार तास वीज मिळत होती त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. ही बाब आम्ही संजयमामा शिंदे यांच्या निदर्शनास आणून ही मागणी केली होती.याबाबत दखल घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अवघ्या अठरा दिवसांमध्ये शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे येथे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या भागातील सिंचनाचे क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्याचा प्रपंच सुखी व समाधानी होण्यास मदत होणार असून आमदार संजय मामा शिंदे यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळुन शेतकऱ्यांचे हित जपल्यामुळे येथील जनता संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आपण संजय मामा शिंदे यांच्या गटात गेल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे करमाळा तालुक्यातील जनता गटातटाच्या राजकारणाला कंटाळली असून आगामी काळात संपूर्ण करमाळा तालुका संजयमामा शिंदे यांच्या विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणार असून संजय मामा शिंदे यांच्या विकासाच्या राजकारणात आपण सहभागी होणार असून संजय मामा शिंदे गटामध्ये राहुन सर्वसामान्य जनता शेतकरी हित जपण्याचे कार्य करणार असल्याचे उद्योजक युवक नेते भरतभाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विजेचा प्रश्न सोडवल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts