loader
Breaking News
Breaking News
Foto

मि चोवीस वर्षा पासुन सेनेत ,संधी दिल्यास पंचायत समिती लढवणार!

मि चोवीस वर्षा पासुन सेनेत असून संधी दिल्यास कोर्टी किंवा केतुर गणातून पंचायत समिती लढवणार अशी इच्छा शिवसेना उपतालुकाप्रमुख भिवा शेजाळ यांनी व्यक्त केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गेली २४वर्षे झाली मी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ काम करत आहे. आहे. १९९६चा शाखाप्रमुख ते शिवसेना चा उप तालुका प्रमुख इथ पर्यंत माझा प्रवास आहे. उमेदवारी बाबत मी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यांच्या ही भेटी घेणार आहे. पक्षाने नेहमीच निष्ठावंत शिवसैनिकाना संधी दिली आहे. व भविष्यात ही पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेना लोकांच्या मना मनात घरा घरात पोहचविण्यासाठी काम करणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील तरूण युवक मिञ मंडळ व ज्येष्ठ मंडळी यांचा आशीर्वाद व पाठिंबा माझ्या सोबत आहे. माझ्या सोबत असलेल्या सहकार्यानमुळेच मी इथ पर्यंत पोहचलो शकलो आहे. भविष्यातही सर्वांना सोबत घेऊनच शिवसेना पक्ष बळकटीसाठी प्रयत्न आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख आमचे दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत. व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रेरणा घेऊनच आम्ही काम करत आहोत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

स्व. शिवाजी मांगले साहेब कारकीर्दीत शाखा प्रमूख, गट प्रमूख, त्यानंतर शाहूराव फरतडे यांच्या बरोबर विभाग प्रमूख म्हणून काम केले. व आता विद्यमान तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड यांनी माझ्या कामाची दखल मला उपतालूका प्रमूख पदाची जबादारी दिली. व ती पक्ष वाढीसाठी रांत्र दिवस वेळ देत आहे. कुटलीही तमा न बाळगता जनतेचे प्रश्न सोडिण्यासाठी प्रयत्न करत असतो. कोर्टी केतूर् या दोन्ही गणापैकी मला पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिल्यास . संधी चे सोने करून दाखवणार..

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts