loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. शिंदे यांच्या हस्ते उद्या डांबर प्लांट व कोळगाव ट्रांसफार्मर चे उद्घाटन माजी आ. जयवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती.

#करमाळा_चौफेर- करमाळा मतदारसंघांमध्ये जिल्हा हद्द कोर्टी विहाळ वीट करमाळा पांडे सालसे आवाटी ते उस्मानाबाद जिल्हा हद्द या रस्त्याचे काम एन. पी. इन्फ्रा प्रो. प्रा. लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून अशियाई विकास बँक च्या अर्थसहाय्यातून सुरू आहे .या कंपनीच्या डांबर प्लांट चे उद्घाटन उद्या आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. जयवंतराव जगताप हे असणार आहेत .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री निरंजन तेलंग. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ,अकलूज. तसेच मा. श्री नितीन तापडिया (कार्यकारी संचालक एन पी इन्फ्रा पुणे , तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पुर्व भागातील नेते भरतभाऊ आवताडे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रम शेलगाव क ( सौंदे - गुळसडी रोड ) येथे 10:30. वाजता होणार आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

उद्या दुपारी 11:30 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत मौजे कोळगाव येथे 3.15 MVA नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामाचे उद्घाटन आ. संजयमामा शिंदे ( विधानसभा सदस्य करमाळा- माढा). यांच्या शुभहस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. जयवंतराव जगताप हे असणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. संतोष सांगळे. ( अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.क सोलापूर ) मा. सुरेश कुऱ्हाडे.( कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क विभागीय कार्यालय बार्शी ). हे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम कोळगाव सबस्टेशन या ठिकाणी होणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुर्व भागातील आमदार संजय मामा शिंदे गटाचे नेते भरतभाऊ आवताडे गौंडरे चे सरपंच सुभाष नाना हनपुडे माजी जिल्हापरिषद सदस्य नानासाहेब निळ हिवरे ग्रामपंचायत सदस्य उमेश मगर यांनी केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts