loader
Breaking News
Breaking News
Foto

विश्वासार्हता गमावलेल्या बागलांच्या तोंडी आव्हानाची भाषा शोभत नाही, मांगीतील तुंबलेल्या गटारींकडे अगोदर लक्ष द्या - वैभवराजे जगताप यांचा पलटवार

काल दिग्विजय बागल यांच्या निवास्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्विजय बागल यांनी जगतापांच्या कारभारास जनता कंटाळली असून परिवर्तन अटळ असल्याचे सांगत सोबत येतील त्यांना सोबत घेवुन बागल गट संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे आवाहन दिले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा चौफेर च्या पोर्टल ने हे वृत्त प्रसिद्ध करताच जगताप गटाकडून देखील नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी जोरदार पलटवार केला असून विश्वासार्हता गमावलेल्या बागलांच्या तोंडी आव्हानाची भाषा शोभत नाही अशी टिका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाततुन केली आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी अधिक बोलताना जगताप म्हणाले की शहरवासियांचा जगताप गटावरच ठाम विश्वास हे गेली २५ वर्षाच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे मात्र आदिनाथ व मकाई कारखान्यांच्या कारभारातून अमाप भ्रष्टाचार करून बागलांनी तालुक्यातील शेतकरी व कामगारांचे प्रपंच उद्धवस्त केले . त्याचे भोग तालुक्यातील जनता आजही भोगत आहे . बागलांनी काठावर ताब्यात आलेल्या मांगी ग्रामपंचायतीमधील गटारी तुंबून तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे अगोदर त्याकडे लक्ष द्यावे, बागलांच्या मांगीतील कारभाराला ग्रामस्थ कंटाळल्यामुळेच निम्मे मतदान विरोधात जावून जाता -जाता ग्रामपंचायत राहिली आहे .त्यांनी त्याची काळजी करावी .शहरातील जनता सुजाण असल्यामुळे बागलांचे कोणतेही वक्तव्य गांभीर्याने घेत नाही असे मत जगताप गटाचे युवानेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा शहरातील जनतेचा जगताप गटाने केलेल्या विकासकामांवर ठाम विश्वास असल्यामुळेच जनतेने गेली २५ वर्षे जगताप गटाच्या ताब्यात सत्ता दिली आहे . नगरपालिकेस स्वच्छता अभियाना मधे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत . अखंड स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व अन्य सोयी सुविधा दिल्या मुळेच शहरवासियांचा जगताप गटाच्या कामकाजावर पूर्ण विश्वास आहे . कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहरात विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे . बागल यांनी दिलेले आव्हान म्हणजे गट टिकविणे साठी उसने अवसाण आणण्याचा प्रकार आहे . बागलांना २० उमेदवारांपैकी ४ उमेदवार उभे करता आले तरी पुष्कळ अशी त्यांच्या गटाची दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांच्या तोंडी आव्हानाची भाषा म्हणजे हास्यास्पद विनोद असल्याची टीका जगताप यांनी केली आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts