loader
Breaking News
Breaking News
Foto

जगतापांच्या कारभारास जनता कंटाळली, नगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे - दिग्विजय बागल

जगताप गटाच्या कारभारास शहरातील जनता कंटाळली असून नगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे असा आत्मविश्वास दिग्विजय बागल यांनी बोलून दाखवला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथील बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळेस अधिक बोलताना बागल म्हणाले की आगामी निवडणुकीत समविचारी एकत्र येवुन आघाडी करण्याचे प्रस्ताव आहेत मात्र ऐनवेळेस आघाडी नाही झाली तरी जे सोबत येतील त्यांना सोबत घेवुन बागल गटाकडून पुर्ण ताकदीनिशी नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा शहर म्हणजे एक सुधारित खेडे असल्यासारखी शहराची अवस्था असून विकासाच्या केवळ गप्पा मारल्या जात असल्याची टिका बागल यांनी केली आहे. अंतर्गत गटारी व रस्ते यावरुन विकास झाला असे म्हणता येणार नाही तो रुटीन कामाचा भाग आहे.शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे, शहराची अवती भोवती राहणार्या नागरींकाना भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी आगामी निवडणुक धनुष्यबाण चिन्ह घेवुन लढवणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मि आज देखील शिवसेनेत असल्याचे त्यांनी सांगीतले मात्र शहरी भागातील मतदारांची मानसिकाता हि पक्षा बाबत वेगवेगळी असते त्यामुळे परस्थिती पाहून निर्णय घेवु असे त्यांनी स्पष्ट केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आगामी नगरपालिका जिल्हापरिषद पंचायत समितीती निवडणुकीत बागल व पाटील युती ठरली असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे यामध्ये तथ्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या तरी कोणती युती अथवा बोलणी झालेली नसून ज्या त्या वेळेस निर्माण होणाऱ्या परिस्थितीनुसार समिकरणे घडतील असे सांगून युती बाबत संभ्रम कायम ठेवला आहे .या पत्रकार परिषदेत बागल यांनी जगताप यांना थेट आवाहन दिले आहे,जगताप गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे आत्ता तालुक्याचे लक्ष लागले आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts