loader
Breaking News
Breaking News
Foto

वक्तृत्व स्पर्धेत राजेश्वरी जगदाळे राज्यात प्रथम

हिसरे ता करमाळा जि सोलापूर येथील कु. राजेश्वरी सदाशिव जगदाळे हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे .राजे शिवरुद्र सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या स्पर्धेत राजेश्वरी जगदाळे हिने "स्वराज्य स्थापनेत राजमाता जिजाऊंचे योगदान" या विषयांवर आपले विचार प्रभावी पणे मांडत परिक्षकांची व श्रोत्यांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता यातुन राजेश्वरी जगदाळे (हिसरे ता करमाळा) प्रथम तर प्रसाद उमेश खेडकर (बारामती)यांने द्वितीय व सातारा येथील विनायक जयसिंग साळुंखे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राजेश्वरी जगदाळे हिस शालेय जीवना पासुनच वक्तृत्व स्पर्धेची आवड असून तिने विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,महात्मा गांधी महाविद्यालय , व पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळवले आहेत. ग्रामीण भागातुन शिक्षण घेत असताना वाचनाची व वक्तृत्वाची आवड जोपासत मिळवत असलेल्या यशाबद्दल राजेश्वरी जगदाळे हिचे पुर्व भागातुन अभिनंदन होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

राजेश्वरी जगदाळे हि सध्या भोर जि पुणे येथे बिए. बि. एड चे शिक्षण घेत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts