loader
Breaking News
Breaking News
Foto

सुधाकर लावंड यांना हायकोर्टाकडुन दिलासा

शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर लावंड यांना हायकोर्टाकडुन तुर्तास दिलासा मिळाला असून अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा शहरात भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष पै रामा ढाणे व सुधाकर लावंड यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता मात्र मागील भांडणाची किनार या वादाला लागल्याने लावंड व ढाणे गटात मारामारी होवुन ढाणे जखमी झाले होते या मध्ये सुधाकर लावंड यांना प्रमुख आरोपी करुन 326 कलम लावले गेले होते .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा सत्र न्यायालय व जिल्हा न्यायालयात लावंड यांचा जामीन फेटाळला होता त्यामुळे लावंड यांच्या अडचणी वाढल्या होत्या मात्र हायकोर्टाकडुन तुर्तास जामीन मंजूर झाल्याने लावंड यांना दिलासा मिळाला आहे.हायकोर्टात लावंड यांच्या वतीने ऍडव्होकोट भाग्यश्री अमर शिंगाडे- मांगले व ऍडव्हकेट अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या मारामरीत लावंड गटाचे सुधाकर लावंड याच्यासह इतर आठ आरोपी होती त्या आठ आरोपींचा करमाळा सत्र न्यायालयात जामीन मंजूर केला आहे तर पै रामा ढाणे यांच्यासह इतर आठ जणांवर देखील 326 अंतर्गत गुन्हे दाखल होते मात्र ढाणे गटाच्या नऊ आरोंपीचा करमाळा सत्र न्यायालयात जामीन मंजूर झालेला आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts