स्व सुभाष आण्णांच्या समाज सेवेचा वसा सावंत कुटुंबांनी जपला- आ. संजयमामा शिंदे ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व सुभाष आण्णांच्या समाज सेवेचा वसा सावंत कुटुंबांनी जपला- आ. संजयमामा शिंदे

कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांनी तालुक्यातील कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी आपले संपूर्ण जीवन खर्च केले. उपेक्षित वर्गाचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. राजकारण म्हणजे समाजसेवेचे माध्यम समजुन त्यांनी काम केले आज त्यांचे पुत्र अॅड राहुल सावंत व सावंत कुटुंब आण्णांच्या पाऊला वर पाऊल ठेवुन राजकारणातुन सामाजिक बांधीलकी जोपासत आहे याचा अभिमान असुन स्व आण्णांना हिच खरी आदरांजली आहे असे मत आ. संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. ते स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिना निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ.संजय कोग्रेकर, वैद्यकिय अधिक्षक अमोल डुकरे, डॉ.प्रशांत करंजकर, डॉ.राहुल कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे डॉ.भरत गायकवाड, डॉ.कपील हिंगमीरे यांनी रक्तसंकलन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी मकाई सहकारी सा कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल तहसिलदार समीर माने , शिबिराला भेट देवून स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या स्मृतीस अभिवादन केले व रक्तदात्यांना प्रोत्साहित केले

भारतीय संस्कृतीमध्ये रक्तदान व अन्न्दान यांना विशेष महत्व आहे. विशेषत: अन्नदान करण्यासाठी अन्नदाते भरपूर मिळतात. मात्र रक्तदान करण्यासाठी रक्तदाते कमी प्रमाणात मिळतात. जो रक्तदान करतो तो रक्तदाता हा दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवितो त्यामुळे अन्नदानापेक्षा रक्तदान मोलाचे आहे. आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मी करमाळा तालुका हमाल पंचायतचे व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे सर्व सदस्य् कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन करतो.आ.संजयमामा शिंदे

- तालुका प्रतिनिधी सा चौफेर

या वेळी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष संतोष वारे, नगरसेवक प्रशांत ढाळे, राजु आवाड, गोविंद किरवे महादेव फंड, डॉ.वसंतराव पुंडे, संचालक अशिष गायकवाड, संचालक शशिकांत केकान, सरपंच भोजराज सुरवसे, सरपंच गौतम ढाणे, कृ.उ.बा.समितीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुळ, आजीनाथ नाईकनवरे, जि.प.माजी सदस्य उध्दव माळी, भगवान भोई, अॅड.राम नीळ, अॅड बळवंत राऊत, सचिन गायकवाड, फारुक जमादार, पत्रकार सर्व श्री सुनिल भोसले, आशपाक सय्य्द, अशोकराव नरसाळे, अलीम शेख, वैभव मुरुमकर, पिंटू मुरुमकर, लहू शिंदे, संतोष वाघमोडे, डॉ.मुरुमकर, डॉ.सुभाष शेंद्रे, झुंबर कावळे, शहाजी शिंगटे, दत्तात्रय नलवडे, सुरेश भोगल, चैतन्य् वारे, प्रा. दिपक सुरवसे, गणेश मुरुमकर, दादासाहेब नवले, शरद पवार, मदनशेठ देवी, नामदेव शेगडे, सागर वाडेकर, विलास दळवी, मनोज गोडसे, निखिल पाटील, सुनील काळे यांनी या ठिकाणी भेट देवुन स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी १६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले . शिबिर यशस्वी करण्यासाठी हमाल पंचायत व छ शिवाजी तरुण मंडळाचे सदस्य विठ्ठल सावंत हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड.राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, सुनिल सावंत, पै. गणेश सावंत , डॉ.संकेत सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल् रासकर, शरद वाडेकर. सागर सामसे, बापु उबाळे, आकाश करकुटे , राजकुमार सुरवसे. विशाल रासकर , प्रशांत बागल, मार्तंड आप्पा सुरवसे, रामा कारंडे, बंडू मुसळे आदी जणांनी परिश्रम घेतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts