loader
Breaking News
Breaking News
Foto

9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर, सी.ए.टी.सी. 716 कॅम्पचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समारोप

करमाळा जि सोलापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 5 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये 9 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापुरचे कमाडींग ऑफिसर कर्नल प्रशांत नायर ( SM, VSM ), A/O कर्नल एस.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सी.ए.टी.सी. 716 कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये बी व सी प्रमाणपत्र परीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा कॅम्प महाविद्यालयात बी.एच.एम. युवराज कापसे व हवालदार नामदेव भोसले यांनी विद्यार्थ्यांना बी व सी प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले . या कॅम्पमध्ये 38 मुले व 10 मुली सहभागी झाल्या होत्या . हा कॅम्प सात दिवस महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या कॅम्पच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी प्राचार्य नागेश माने, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक , डॉ. अनिल साळुंके, क्रीडाविभाग प्रमुख डॉ. अतुल लकडे , लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे हे उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कॅम्पमध्ये रायफल खोलना-जोडना स्पर्धमध्ये प्रथम क्रमांक - दळवी आदेश , द्वितीय क्रमांक - ननवरे अनिल, तृतीय क्रमांक - कोल्हे रेणुका यांनी मिळविला . त्याचबरोबर लेखी परीक्षा स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक - कोल्हे रेणुका, द्वितीय क्रमांक - मिश्रा अलोक, तृतीय क्रमांक - राऊत अमोल यांनी मिळवला. तर बेस्ट कॅडेट म्हणून अलोक मिश्रा या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला . या कार्यक्रम समारोप प्रसंगी डॉ. अनिल साळुंखे, माजी प्राचार्य नागेश माने , उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक, बी.एच.एम युवराज कापसे यांनी कॅडेटला मार्गदर्शन केले. तनिषा पडवळे , अलोक मिश्रा या कॅडेटनेही मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी विद्यार्थ्यांनी कॅम्प मधील सर्व गोष्टींचा अभ्यास करून चांगल्या गुणांनी बी व सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व्हावे असे सांगितले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मुक्ता काटवटे यांनी केले तर आभार सि.टी.ओ. निलेश भुसारे यांनी मानले . हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्रा. दिलीप थोरवे , अक्षय भोसले, डी. टी. कांबळे, गणेश वळेकर यांचे विशेष योगदान लाभले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts