आमदार संजय मामा शिंदे गटात सुरु असलेले कार्यकर्त्यांचे इनकंमींग थांबवण्यात बागल पाटील गटाच्या नेतेमंडळसीस थांबवता येत नसल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत असुन, राजुरी,देवळाली,झरे,लव्हे,जेऊर,मांगी, फिसरे ,निमगाव, या गावातील पाटील व बागल यांचे अनेक प्रमुख कार्यकर्ते आमदार संजय मामा शिंदे गटात अगोदरच सामील झाले आहेत.
आज नारायण पाटील यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले पश्चिम भागातील अभ्यासु जाणकार नेतृत्व म्हणून परचित असलेल्या एका नेत्याचा शुक्रवारी आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची पोस्ट पश्चिम भागातील एका व्हाट्सप ग्रुपवर व्हायरल होत आहे.हि पोस्ट खरी का खोटी खात्री करण्यासाठी संबंधित नेत्यास फोन केला असता संपर्क होवु शकला नाही .हा प्रवेश झाल्यास माजी आमदार नारायण पाटील यांच्या साठी हा धक्का मानला जाईल
पश्चिम भागातील अॅड अजित विघ्ने यांच्या संदर्भात हि पोस्ट असुन अजित विघ्ने हे शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. विघ्ने हे केत्तुर गावचे माजी सरपंच असुन त्यांनी विविध शासकीय कमिटीवर काम केले आहे.. सन२०१२ साली त्यांनी जगताप गटाकडुन पंचायत समितीची निवडणुक ही लढवली होती.. शिवसेना नेते स्व शिवाजीराव मांगले, शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे माजी मंत्री दिंगबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप, यांचे बरोबरही त्यांनी काम केले असुन, सध्या ते माजी आमदार नारायण पाटील गटाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती करीता ते पाटील गटाकडून इच्छुक देखील होते .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.