loader
Breaking News
Breaking News
Foto

फसव्या घोषणा करणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा ठेवाव्या - अतुल खुपसे-पाटील

फसव्या घोषणा करणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा ठेवाव्या असे वक्तव्य जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी दिलमेश्वर (ता. करमाळा) येथे जनशक्ती संघटनेच्या शाखा उदघाटन व शेतकरी मेळाव्या दरम्यान केले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी अधिक बोलताना खुपसे म्हणाले की, स्थानिक आमदार महोदयांकडून रस्ते, पाणी व सिंचन यासाठीचे कोट्यवधी रुपयांचे आकडे नुसतेच बोर्डावर आहेत. याचा सामान्य जनतेला कवडीचा देखील फायदा नाही. जर ६ महिने गावचे ट्रांसफार्मर बंद असतील तर अश्या निष्काळजी आमदार कडून आपण काय अपेक्षा कराव्या. निवडणुकीत मतदानावेळी नुसत्याच विकासाच्या आणाभाका केल्या. मात्र अडीच वर्षानंतर वीज आणि पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्या तर जनतेने व्यथा मांडायच्या कुणाकडे असा सवाल करून मतदाना पुरते फसवी आश्वासने देणाऱ्यांना वेळीच ओळखा असे आवाहन देखील जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी बागल गटातून पार्टी प्रमुख वैभव मस्के यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी वैभव मस्के म्हणाले की गावच्या विकासासाठी व शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनशक्ती संघटनेत प्रवेश करत आहोत. गावच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जनशक्ती च्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी स्वताला झोकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी अविनाश महाराज कोडलिंगे, बाबासाहेब चव्हाण, राम इटकर, राणा वाघमारे, रोहन नाईकनवरे, कल्याण गवळी, अक्षय शिंदे, सागर शिंदे, अभि नवले, काका कोळी, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, बालाजी तरंगे, समाधान भोई, निखिल सरडे, मारुती खटके, जोतिराम तरंगे, राजू जाधव, अनिकेत जाधव, शरद एकाड़, अजीज सय्यद, भारत ननवरे, अतुल भोसले, देवीदास नेमाने, आबासाहेब नेमाने, पांडुरंग ननवरे, हमीद इनामदार, मनोहर् नेमाने, जब्बार शेख, पांडू भोसले साहेबराव विटकर, अशोक नगरे, सचिन मल्लाव, राजू मल्लाव, नवनाथ नगरे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts