loader
Breaking News
Breaking News
Foto

मंजूर झालेले हायमास्ट दिवे बसवावेत - आ.संजयमामा शिंदे यांची ग्रामविकास मंत्र्याकडे महत्वपूर्ण मागणी

महाराष्ट्र शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार हायमास्ट दिवे बसवू नये , असे आदेश 8 डिसेंबर 2021 रोजी पारित झाले आहेत. मात्र 8 डिसेंबर 2021 पर्यंत मंजूर झालेले हायमास्ट दिवे बसवावेत , अशी महत्वपूर्ण मागणी आ.संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यातील जवळपास 70 गावात चालू आर्थिक वर्षात 80 लाख रूपये किंमतीचे हायमास्ट दिवे मंजूर झालेले आहेत . या दिव्यांच्या मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे असे असताना अचानक मंजूर झालेले हायमास्ट दिवे रद्द करणे चुकीचे ठरत आहे .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्यामुळे शासनाने 8 डिसेंबर पूर्वी मंजूर झालेले सर्व दिवे बसवण्यासाठी सुधारित अध्यादेश काढावा , अशी मागणी लेखी पत्राद्वारे आ. संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे . हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील असून वर्षानुवर्षे वाड्यावस्तीवर राहणारे ग्रामीण भागातले लोक अंधारात राहत आहेत . त्यांच्या वस्त्या प्रकाशमान करण्याची वेळ आलेली असताना , एका निर्णयाने सर्व ग्रामीण भागातल्या वस्त्या पुन्हा अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे . यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा विचार करून निदान मंजूर झालेल्या व निधी वर्ग झालेल्या कामांना वगळून नवीन अध्यादेश काढावा , अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार संजयमाम शिंदे यांनी ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यावरील जनतेसाठी केलेल्या या महत्वपूर्ण मागणीचे स्वागत होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts