loader
Breaking News
Breaking News
Foto

पुर्वभागातील वीज प्रश्न एक महिन्यात सोडवणार- आमदार संजय मामा शिंदे

करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून कोळगाव सब स्टेशन वरील जळालेला ट्रान्सफॉर्मर एका महिन्यात कार्यान्वित होणार आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कोळगाव सब स्टेशन वरील ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने गत उन्हाळ्यात फक्त ४ तास विद्युत पुरवठा होत होता परीणामी शेतकर्यांचे अतोनात हाल व नुकसान झाले. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुर्व भागातील शेतकऱ्यांनी विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांना हिवरे येथील प्रवेशाच्या कार्यक्रमात विनंती केली असता आज सोलापूर येथे जिल्ह्याचे महावितरण चे मुख्य अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर चालू करू असे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले. या प्रसंगी चोभे पिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, तानाजी बापू झोळ, बाळासाहेब जगदाळे,भरत भाऊ अवताडे, मानसिंग भैय्या खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर,हिवरे चे माजी सरपंच उमेश मगर, मिरगव्हण चे सरपंच पांडुरंग हाके, अर्जून नगर चे सरपंच प्रकाश थोरात, आबासाहेब सांडगे रामचंद्र पवार श्रीराम निळ आदी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान गेल्या वर्षांपासून ट्रान्सफार्मर बसवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती चार तास वीज पुरवठा होत असल्याने धरणात पाणी असून देखील शेतकऱ्यांना पिकास पाणी देता आले नाही त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले व वीजबिल मात्र आठ तासाचे भराने लागले मात्र याकडे सोयीसकर पणे दुर्लक्ष करण्यात येत होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts