शेतकऱ्यांनी केले सिना कोळगाव धराणातील पाणी पुजन ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांनी केले सिना कोळगाव धराणातील पाणी पुजन

. यापूर्वी धरणात सलग तीन वर्षे उपयुक्त पाणी साठा नसल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला होता. पाणी साठा अत्यंत असल्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात सिना नदी पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाला असुन व या जिल्ह्यातील "निमगाव गांगुर्डे"धरण पूर्ण क्षमतेने भरले असुन ओव्हर फ्लो झाल्याने सिना नदीत पाणी येत आहे. त्या मुळे कोळगाव धरणात पाणी साठा झाला आहे. त्या मुळे शेतकऱ्यात आनंद असुन या पाण्याचे विधिवत पूजन करून खणा, नारळाची ओटी भरून आलेल्या पाण्याचे पुजन केले आहे.

सिना कोळगाव धरण परिसरात आणखीन एकही मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे धरण पूर्ण भरते का नाही याची खात्री नाही त्यामुळे कूकडी प्रकल्पाचे अतिरिक्त वाहून जाणारे ओव्होरफ्लोचे पाणी सिना नदीत सोडून सिना कोळगाव धरणात सोडावे. -सतिश निळ अध्यक्ष धरणग्रस्त संघटना

चौफेर प्रतिनिधी

नेरले ग्रामपंचायतचे माजी सरपंच औदुंबरराजे पाटील, निमगाव ह सरपंच प्रतिनिधी व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ननवरे, ज्येष्ठ नागरिक आंबऋषी भील, माजी सदस्य गोकुळ साळुंखे, बप्पा रोकडे, कालिदास नीळ, अजिनाथ टाळके, ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बांधवांची जलदायनी म्हणून उपयुक्त असलेल्या कोळगाव धरणात तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे पुर्व भागातील शेतकरी बांधव आनंदीत झाले आहेत.आज निमगाव, कोळगाव, नेरले येथील शेतकरी बांधवांनी खणा -नाराळाने ओटी भरुन या पाण्याचे पुजन केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts