loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा मतदार संघावर ओमीक्रोनचे संकट येऊ देऊ नकोस म्हणून माजी आमदार नारायण पाटील गटाकडून श्री शनीदेवास साकडे

करमाळा मतदार संघावर ओमीक्रोनचे संकट येऊ देऊ नकोस म्हणून माजी आमदार नारायण पाटील गटाकडून श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथे जाऊन श्री शनीदेवास साकडे घालण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आज पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी शिंगणापूर येथील श्री शनीदेवाचे दर्शन घेतले व माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या वतीने श्री शनीदेवास करमाळा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांचे ओमीक्रोन ह्या साथीच्या जीवघेण्या विषाणू पासून संसर्ग होऊ नये म्हणून संरंक्षण कर असे साकडे घातले.यावेळी माजी आमदार पाटील गटाच्या वतीने मनोमन संकल्पही श्रीक्षेत्री शनीदेवासमोर व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत कोंढेज गावचे संरपंच प्रतिनीधी निलेश राऊत, उपसरपंच शहाजी राऊत, संघटक गणेश सालसकर, श्री संत नरहरी सोनार संघटनेचे श्रीनिवास महामुनी आदि उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

याबाबत अधिक माहिती देताना सूनील तळेकर यांनी स्पष्ट केले की हा तीर्थक्षेत्र दौरा करमाळा मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी केलेला असून यामागे कसलीही अंधश्रद्धा नाही. श्री शनीदेव मंदिर देवस्थान हे भारतातील एक प्रसिध्द देवस्थान असून कोट्यावधी भाविकांची या देवस्थानावर नितांत श्रद्धा आहे.आम्ही सुध्दा या शेकडो कोटीत मोडणारे एक श्रध्दाळू भाविक आहोत. माजी आमदार नारायण पाटील यांची श्रध्देय आयोध्यानिवासी स्वामी आनंदयोगी महाराज यांचेवर मनोमन श्रध्दा होती व महाराजांनी मानवी देह सोडून गेल्यानंतरही तशीच कायम आहे. यामुळेच माजी आमदार नारायण पाटील यांचा एक कार्यकर्ता म्हणून कोणत्याही ईश्वरी शक्तीवर श्रध्दा ठेवणे मला महत्वाचे वाटले व त्याच भावनेतून एक सामाजिक हेतू बाळगून आम्ही येथे दर्शनासाठी आलो आहोत. आगामीकाळात करमाळा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूका यामध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळणारच याची खात्री आहे. कारण माजी आमदार नारायण पाटील यांची जितकी देवावर श्रध्दा व विश्वास आहे अगदी तितकाच सर्वसामान्य नागरिकांवरही आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सन 2014 ते 2019 दरम्यान मतदार संघातील अनेकवर्ष रखडलेली कामे पुर्ण झालीच पण त्याहून अधिकपटीने नवीन विकासकामेही झाली. यामूळे आगामी निवडणुकीत धनशक्तीचा पराभव करण्यासाठी विकास हाच मुद्दा घेऊन पाटील गट यश मिळवेल. आगामी निवडणूकात कोणत्याही इतर गटाशी यूती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी स्पष्ट केले. तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील जो निर्णय घेतील तोच अंतिम आदेश मानून पाटील गटाचे तमाम कार्यकर्ते विजयासाठी सर्वस्व पणाला लावून काम करतील असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला. तुर्तास माजी आमदार नारायण पाटील यांच्या अथक प्रयत्नांनंतर करमाळा मतदार संघातील आरोग्यसेवा सूधारली असून लसीकरणातही मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळाला.आगामी ओमीक्रोन पासून तमाम नागरिकांचे संरक्षण मिळो व करमाळा मतदार संघातील आरोग्य, पोलीस तसेच पंचायत समिती व। महसुल खात्यातील फ्रंटलाईन वर्कर व कुशल अधिकारी यांनाही आगामी काळात ओमीक्रोनच्या रोगापासून मतदार संघातील नागरिकांना वाचवण्यासाठी ताकद मिळो हेच साकडे श्री शनीदेवाजळ घातल्याचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी बोलून दाखवले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts