loader
Breaking News
Breaking News
Foto

हिवरे येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ९३ टक्के मतदान !

हिवरे येथील प्रभाग क्रमांक दोन मधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीत ९३ % मतदान झाले आहे.या निवडणुकीस मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असुन ४०९ पैकी ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.या मध्ये २११ पुरुष व १७० महिला मतदारांचा समावेश आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत बागल पाटील युतीचे अतुल अजिनाथ फरतडे व संजयमामा शिंदे व नारायण पाटील युतीच्या उमा सुरेश शिंदे हे दोन उमेदवार रिंगणात होते. उमा सुरेश शिंदे यांना जगताप गटाबरोबरच बागल गटाच्या देखील काही कार्यकर्त्यांचे समर्थन होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

विशेष म्हणजे चुरशीने मतदान होत असताना शांततेत व मैत्रीपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. साह्यक पोलीस निरीक्षक प्रविण साने यांनी बिट हवालदार शेख व घोरपडे यांच्यासह होमगार्ड व महिला पोलीसांची टीम तैनात ठेवून चोख बंदोबस्त ठेवला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उद्या या निवडणुकांसाठी मतमोजणी होणार असून अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.हिवरे गावच्या या पोटनिवडणुकीकडे पुर्व भागाचे लक्ष लागले आहे. दरम्यान वरकटणे व पांगरे या या दोन गावामध्ये देखील पोटनिवडणूक प्रकिया पार पडली आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts