loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदुस्थान फिड्स कंपनीकडून हिवरे येथील प्राथमिक शाळेत मास्क व वह्यांचे वाटप

हिंदुस्थान फिड्स कंपनीकडून जि.प.शाळा हिवरे येथील इ. १ ली ते ७ वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व मास्क वाटप करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी हिंदुस्थान फिडस कंपनीचे विस्तार अधिकारी डाॅ. कोकाटे साहेब विद्यार्थांशी संवाद साधताना म्हणाले की कंपनी शेतक-यांचे उत्पादन वाढवून त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुला-मुलींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत. शिक्षण घेऊन भविष्यात मोठे होऊन आपणही समाजासाठी आपले योगदान द्या. जीवन जगत असताना हक्क व कर्तव्याशी कायमस्वरूपी बांधील राहून सुजाण नागरिक बना. असे आवाहन त्यांनी केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी कंपनीचे विस्तार अधिकारी श्री.कोकाटे साहेब, विक्री अधिकारी श्री.महेश टेके साहेब, जगताप पशुखाद्य केंद्र करमाळाचे संचालक श्री. जगताप साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री. ब्रह्मदेव फरतडे, मुख्याध्यापक श्री.सुग्रीव नीळ सर, श्री. सुरेश शिंदे सर, श्री. निळकंठ हनपुडे सर, श्री. लहु चेंडगे सर, श्री. शिवाजी खरात सर, श्री. सतिश सुर्यवंशी सर, श्रीम. पल्लवी कुलकर्णी मॅडम, श्री.जालिंदर हराळे सर व ग्रामस्थ उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. शिवाजी खरात सर व आभारप्रदर्शन श्री.जालिंदर हराळे सर यांनी केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts