loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योजक बाळासाहेब कोळपे यांच्या वाढदिवसानिमित्त विट येथे वृक्षारोपण

लोणी काळभोर पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व साधना बँकेचे विद्यमान व व्हाईस चेअरमन सन्माननीय श्री बाळासाहेब कोळपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 201 वृक्षांचे रोपण वीट ता.करमाळा येथे करण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत परिसरात या वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्ष लागवडी मध्ये प्रमुख्याने वड, पिंपळ, चिंच, पळस, कडुलिंब, बोर,पेरू, आंबा आदी झाडांची लागवड करण्यात आली

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे, कृषी उत्पादन बाजार समिती करमाळा चे संचालक देवानंद ढेरे ,माजी सभापती श्री गाडे लोकनियुक्त सरपंच उदयजी ढेरे ,उपसरपंच समाधान कांबळे ,यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आदर्श शिक्षक अर्जुन ढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे खाटमोडे गुरुजी दगडूशेठ सरडे सह दादाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष माधवजी जाधव अजित भाऊ ढेरे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कार्यक्रमाचे आयोजन दादाश्री फाऊंडेशनचे संस्थापक श्री काका काकडे यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना नाश्ता व चहा पाण्याचे नियोजनही करण्यात आले होते. श्री काका काकडे यांनी आत्तापर्यंत ५००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत व जपली आहेत त्यांचं सर्व तालुकाभर कौतुक होत आहे आदर्श व्यक्तिमत्व बाळासाहेब कोळपे साहेब यांना वाढदिवसाच्या व काकडे यांच्या सामाजिक कार्याची आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts