loader
Breaking News
Breaking News
Foto

शेलगाव (वांगी) येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

करमाळा (दि.१२): शेलगाव (वां) ता.करमाळा येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने श्री आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक बापूराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजपा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके हे उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना श्री साळुंके यांनी स्व. मुंडे यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत सांगितले की, मुंडे साहेबांचा विरोधी पक्षात असतानाही एक वेगळा दरारा होता, सर्वच राजकिय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, सर्व सामान्यांचा आवाज हा गावातून संसदेत पोहचवणारे व अन्यायाला वाचा फोडणारे नेतृत्व म्हणजेच मुंडे साहेब होते.भाजपाला तळागाळातील वंचित, शोषित,कष्टकरी, शेतकरी, शेत मजूर व अठरा पगड जातीचं नेतृत्व करणारा लोकशाहीतील खरा लोकनेता त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाला होता, आज समाजात अशा नेत्यांचा आदर्श घेवून लोकशाही बळकट करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

यावेळी माजी सरपंच शहाजी पाटील, माजी सरपंच त्रिंबक पोळ,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष हिरू तात्या कोंडलकर, ग्रा.पं.सदस्य सुधीर साळुंके, युवराज काळे पाटील, सोमनाथ पवळ, गोडसे महाराज, गणेश केकान, लक्ष्मण खाडे, नागनाथ केकान, प्रदीप जगताप, भारत चिंचकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. भाजपा किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts