शालेय जीवन आठवले की सर्व बालपणीचे मित्र आठवतात. त्यांच्याबरोबर धमाल, मस्तीमध्ये घालवलेले दिवस आठवतात. ते आपुलकीने शिकवणारे शिक्षक, मित्रमैत्रिणीबरोबर मधल्या सुट्टीत संपवणारा डबा आणि लगेच हातात हात घालून पकडापकडी खेळण्याची घाई, हे सगळे आठवते मात्र कालंतराने आपल्याला शाळा सोडावी लागते पुढील शिक्षण, नोकरी,व्यवसाय व प्रापंचिक व्यापामुळे आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा आपल्याला विसर पडतो.आपण शिकत असताना शाळेत ज्या सुविधांचा अभाव होता त्या सुविधा किमान गावातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळाव्यात, दर्जेदार शिक्षण मिळावे ,खेळासाठी सुसज्ज मैदान असावे असे आपल्याला वाटत नाही.
करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र व करमाळा पंचायत समितीतीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे मात्र यास अपवाद ठरले आहेत आपले बालपण ज्या शाळेत गेले ,पहिली ते सातवी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्या घोटी येथील जिल्हापरिषद शाळेचा कायापालट करण्यासाठी स्वतः गटविकास अधिकारी यांनी चंग बाधला आहे. शाळेच्या "सायन्स वाॅल " संकल्पनेसाठी त्यांनी स्वतः दहाहजार एक रुपयाची देणगी दिली आहे व ग्रामस्थ व शिक्षकांना देखील आवाहन केले आहे यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
घोटी सारख्या ग्रामीण भागातुन अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन मनोज राऊत यांनी गटविकास अधिकारी पदापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत बालवयातच जर चांगले शिक्षण, विविध उपक्रम, शाळेतील प्रसन्न वातावरण ,खेळासाठी मैदान व करिअर विषयी योग्य मार्गदर्शन मिळाले तर लाखो रुपयांपर्यंत खर्च करून शहरी भागातील व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीच सरस ठरु शकतो असे त्यांचे ठाम मत असून, गटविकास अधिकारी म्हणून काम करत असताना ग्रामसमृद्धी बरोबरच शाळा सुधारण्याचा त्यांनी धडाका लावला आहे.लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील अनेक शाळांचा ग्रामपंचायत निधी ,लोकसहभागातुन व शिक्षकांच्या सहभागातून कायापालट केला आहे .तसेच त्यांनी स्वतःदेखील सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. राऊत यांची करमाळा येथे बदली झाली त्या वेळेस चा देवणी येथील निरोप समारंभ कार्यक्रमाचे जाहीर सभेत रुपांतर झाले होते.अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समीती अध्यक्ष आरोग्य विभागातील कर्माचारी राजकीय नेते मंडळीं अतिशय भावनिक वातावरणात साहेबांना निरोप देत होते .करमाळा येथे बदली झाल्यानंतर देखील त्यांनी सर्व प्रथम अनेक गावातील शाळांना भेठी दिल्या आहेत . विद्यार्थ्यांना महापुरुषा बरोबर वैज्ञानिकांबाबत अभिमान उत्पन्न व्हावा, वैज्ञानिकांचे शोध व त्यांचे कार्य माहिती व्हावे या करता सर्व शाळेत वैज्ञानिकांचे फोटो लावून त्या भिंतीस"सायन्स वाॅल " हे नाव देण्याची संकल्पना त्यांनी व्यक्त केली होती यास अनेक शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाचे स्वागत करुन हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्य़ात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.