loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची उमरड येथे बैलगाडीतून मिरवणूक!

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व करमाळा पंचायत समितीतीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे उमरड येथील नागरिकांनी बैलगाडीतून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत केले. नुकतेच गटविकास अधिकारी यांनी सर्व महापुरुषां बरोबर प्रत्येक शाळेत वैज्ञानिकांचे फोटो लावून जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. व 21 वैज्ञानिक यांचे फोटो त्यांनी लावलेले महत्वपूर्ण शोध याची पीडीएफ माहिती प्रत्येक जिल्हा परिषद शाळे दिली होती व हे सर्व फोटो एका भिंतीवर लावून त्याचे "सायन्स वाॅल" असे नामकरण करावे असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले होते. या आवाहनानुसार उमरड शाळेत सर्वांत पहिल्यांदा "सायन्स वाॅल "उभारण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून साकरलेल्या उमरड येथील जिल्हापरिषद शाळेतील पहिल्या सायन्स वाॅल (विज्ञान भिंत) चे उद्घाटन आज दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिलीप स्वामी यांनी मनोज राऊत यांच्या उपक्रमाचे स्वागत करुन हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्य़ात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच 22 तारखेला असणाऱ्या रामानुजन यांच्या जयंती पूर्वी सर्व शाळेत science wall तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत आणि मुख्याध्यापक याना देण्यात आल्या. तसेच या वेळी आपले सरकार केंद्रचालक यांनी कामात दिरंगाई केल्यास कामावरून कमी करण्याची ताकीद देण्यात आली.आपले सरकार केंद्र संबंधित ग्रामपंचायत च्या हद्दीतच कार्यरत असावे.हद्दीबाहेर असल्यास कारवाई करण्यात येईल.असा इशारा देखील स्वामी यांनी दिला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

लसीकरण वाढवावे, माझी वसुंधरा मध्ये काम करावे आचारसंहिता पूर्वी सर्व विकास कामांच्या वर्क ऑर्डर द्याव्यात,शाळांवर विशेष लक्ष द्यावे, शाळा अंगणवाडी ना नळ कनेक्शन द्यावेत,जल जीवन मिशन च्या कामांना गती द्यावी.अशा सुचना ग्रामसेवकांना दिल्या असुन शोषखड्डे अभियान यशस्वी राबविण्यात आल्याबद्दल अभिनंदन देखील केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सायन्स वाॅल मुळे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची माहिती होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान वाढण्यास मदत होईल व विविध वैज्ञानिक प्रयोग व उपक्रम राबविण्या बाबत जिज्ञासा उपलब्ध होईल असे सांगून दिलीप स्वामी यांनी मनोज राऊत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts