मानवता फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

मानवता फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन

करमाळा तालुक्यातील मानवता फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. करमाळा तालुक्यातील रक्तदान साठी स्थापन करण्यात आलेल्या मानवता फाऊंडेशनच्या वतीने येत्या १५ अॉगस्ट स्वातंत्र्य दिनाला भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदरील रक्तदान शिबीर जेऊर येथील स्वामी विवेकानंद हॉल तसेच आदिनाथ कारखाना आणि ढोकरी येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात येणार असून जास्तीतजास्त जणांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन मानवता फाऊंडेशनने केलेले आहे.

जेऊर प्रतिनिधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts