loader
Breaking News
Breaking News
Foto

लसीकरण मोहीम कडे दुर्लक्ष तालुक्यातील या सात गावातील सरपंचाचे पद होणार रद्द? मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा कारवाईचा इशारा!

कोरोना लसीकरणासाठी गावागावात लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे असताना सुद्धा गावचे सरपंच लसीकरणासाठी साथ देत नसल्यामुळे त्यांचे सरपंच पद का रद्द करण्यात येऊ नये? अशा प्रकारची नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ५५ गावच्या सरपंचांना धाडली आहे. करमाळा तालुक्यातील सात गावांच्या सरपंचांचा यात समावेश असल्याने सरपंचाचे धाबे दणाणले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ अनुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत नोटीस बजावत कडक पावले उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लस देण्यात येते. गावागावातील आशा वर्कर्स यासाठी जनजागृती करतात. वाड्या-वस्त्यांवरती जाऊन लोकांना समजावतात मात्र, सरपंच लसीकरणाबाबत गांभीर्य बाळगत नसल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर राज्य शासन लसीकरणाबाबत प्रचंड गंभीर झाले असून प्रशासन सध्या त्यासाठी मिशन मोडवर आहे.करमाळा तालुक्यातील उंदरगाव, धायखींडी, बिटरगाव श्री, पोंधवडी, बिटरगाव (वां) निमगाव (ह) आवाटी या सात गावामध्ये लसीकरण टक्केवारी कमी असल्याने या सात गावातील सरपंचाना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्यावर पद रद्द करण्याची कारवाई का करु नये असे विचारत नोटीस बजावली आहे.उंदरगाव येथे 52 % धायखींडी येथे 55% ,बिटरगाव श्री 55% पोंधवडी 57% बिटरगाव (वां ) 61% , निमगाव ह 61%,आवाटी62% लसीकरण झाले आहे.असे आरोग्य विभागाकडून कळवले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान सरपंचावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना अनेक गावात ग्रामसेवक लसीकरणा साठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत, अनेक ठिकाणी लसीकरण साठी कॅम्प वर हजर राहत नाहीत , तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उदा उपलब्ध करुन देत नाहीत अशा कामचुकार ग्रामसेवकांना का सुट दिली जात आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts