loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत पोटनिवडणूक तिन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात ! हे आहेत उमेदवार व निवडणूक चिन्ह.

करमाळा तालुक्यातील एकूण चौदा ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक कार्यक्रम सुरु आहे.मात्र न्यायालयाने ओबीसी आरक्षण संदर्भात दिलेल्या आदेशानुसार चौदा पैकी वाशींबे येथील एका जागेसाठी असलेली पोटनिवडणूक रद्द झाली आहे.या ठिकाणी तुकाराम भगवान डोंबाळे देखील एकमेव अर्ज दाखल झाला होता. दरम्यान केत्तूर, टाकळी (रा), लव्हे,अंजनडोह, तरटगाव, उंदरगाव व या सहा ठिकणी एकमेव अर्ज दाखल असल्याने सखुबाई पोपट येडे (केतुर) कविता राजेंद्र नगरे (टाकळी रा) संतोष सौदागर होगले(लव्हे) किरण बिभिषण ढेरे (अंजनडोह ) ) किरण वाळुंजकर (तरटगाव ) धर्मराज सुभाष कोकरे (उंदरगाव) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.अर्ज माघारी घेण्याच्या (9 डिसेंबर )शेवटच्या दिवशी रोशेवाडी येथील उमेदवारांने माघार घेतल्याने यशपाल कांबळे हे बिनविरोध झाले आहेत .उर्वरित हिवरे ,वरकटणे व पांगरे येथे उमेदवार आमने सामने आल्याने निवडणूक लागली असून तिन जागांसाठी एकुण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

. हिवरे येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये होणार्‍या सर्वसाधारण जागेसाठी अतुल अजिनाथ फरतडे विरुद्ध उमा सुरेश शिंदे यांच्यात लढत होणार आहे. अतुल फरतडे यांना गॅस टाकी तर उमा शिंदे यांना नारळ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पांगरे येथे प्रभाग क्रमांक दोन मधिल सर्वसाधारण जागेसाठी तिन उमेदवार रिंगणात असून भैरवनाथ दत्तु हराळे, शंकर कांतीलाल गुटाळ,महेश आत्माराम शेळके यांच्यात लढत होणार आहे. हराळे यांना शिट्टी, गुटाळ यांना कपबशी तर शेळके यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. वरकटणे येथील प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण जागेच्या निवडणूकी साठी नवनाथ गोकुळदास देवकर व संतोष सुग्रीव देवकर हे दोन उमेदवार रिंगणात असून नवनाथ देवकर यांना सफरचंद तर संतोष देवकर यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

21 डिसेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts