loader
Breaking News
Breaking News
Foto

एक महिन्यानंतर करमाळा आगारातून धावल्या दोन एस टी बसेस ! लाल परी सेवेत हजर होत असल्याचा आनंद- आगार प्रमुख आश्विनी किरगत

संप कालावधी नंतर जवळपास एक महिन्यानंतर करमाळा आगार पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी हळूहळू सुसज्ज होत आहे. आज दिनांक 7/12/ 2021 रोजी करमाळा आगारातून दोन बसेस वाहतुकीसाठी बाहेर पडल्या. करमाळा - टेंभुर्णी या मार्गावर बसेस धावल्या आहेत. पुन्हा एकदा लालपरी ला प्रवाशांच्या सेवेत दाखल होताना पाहून आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया आगार प्रमुख आश्विनी किरगत यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना व्यक्त केली असुन सर्व कर्मचाऱ्यांना स्वमर्जीने कामावर हजर होण्याबाबत आवाहन केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना किरगत म्हणाल्या आहेत कि कर्मचाऱ्यांसोबत बऱ्याच वेळा चर्चा केली. बऱ्याच कर्मचाऱ्यांना मोबाईलद्वारे कॉल करून कामावर उपस्थित राहण्याची विनंती केली तसेच आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत आवाहन केले होते यास काही कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आज एक महिन्यानंतर करमाळा आगारात लाल परीचे आगमन झाले आहे.व प्रवाशांच्या सेवेस सुरुवात झाली असल्याचा आनंद वाटत असल्याचे म्हटले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढ दिली आहे व दिलेल्या पगारवाढी नुसार आपली नोव्हेंबर महिन्याची पगार जमा होणार आहे. तरी आपण आपल्या लालपरीच्या भवितव्यासाठी कामावर हजर व्हावे, असे भावनिक आवाहन देखील आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या आवहानास आणखी कर्मचारी प्रतिसाद देऊन कामावर हजर होतील असा विश्वासही किरगत यांनी व्यक्त केला असुन जसजसे कर्मचारी हजर होतील तसतसे अजून जास्तीच्या बसेस मार्गावर धावतील व प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगीतले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts