loader
Breaking News
Breaking News
Foto

एकमेव अर्ज दाखल असल्याने सात गावातील पोटनिवडणूक बिनविरोध तर,तिन गावातुन एक ही अर्ज दाखल नाही ! चार जागांसाठी १३ जण रिंगणात नऊ तारखेला होणार चित्र स्पष्ट!

करमाळा तालुक्यातील रिक्त झालेल्या चौदा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या जागेवर पोटनिवडणूक कार्यक्रम सुरु असुन ३० नोव्हेंबर पासुन अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या ६ डिसेंबर या तारखेपर्यंत चौदा पैकी सात गावातील एकमेव उमेदवाराचाच अर्ज दाखल असल्याने या सात जागा बिनविरोध जाहीर होण्याची औपचारिक घोषणा बाकी आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तालुक्यातील हिंगणी, खडकी, देलवडी या गावातील पोटनिवडणूकासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने या जागा पुढील निर्णया पर्यंत रिक्तच राहणार आहेत. एकमेव अर्ज दाखल असल्याने बिनविरोध होण्याची औपचारिकता बाकी असलेल्या उमेदवारामध्ये सखुबाई पोपट येडे (केतुर) कविता राजेंद्र नगरे (टाकळी रा) संतोष सौदागर होगले(लव्हे) किरण बिभिषण ढेरे (अंजनडोह ) तुकाराम भगवान डोंबाळे (वाशिंबे) किरण वाळुंजकर (तरटगाव ) धर्मराज सुभाष कोकरे (उंदरगाव) यांचा समावेश आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

उर्वरीत रोशेवाडी येथील एका जागेसाठी तिन अर्ज दाखल आहेत तर पांगरे येथील एका जागेसाठी दोन अर्ज, हिवरे येथील एका जागेसाठी पाच अर्ज व वरकटणे येथील एका जागेसाठी तिन अर्ज दाखल आहेत . एकंदरीत चार गावातील चार रिक्त जागांवर तेरा उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होईल. पोटनिवडणुकी साठी २१ डिसेंबर रोजी मतदान व 22 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान कोरोनाच्या नव्या ट्रेंड च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकिया शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य करण्याचे तहसीलदार समीर माने यांनी नागरींकाना आवाहन केले आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts