अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे लहान मुलं साथीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्या साठी फिरत्या वैद्यकीय पथक उसतोड मजुरांच्या कोपी पर्यंत पाठवा आशी महत्वपूर्ण मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड व तालुकाध्यक्ष अर्जुनराव गाडे यांनी तहसीलदार समीर माने यांना लेखी निवेदना द्वारे केली आहे.
पुढे या निवेदनामध्ये गायकवाड म्हणाले की,गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरामध्ये कोविड १९,(कोरोना) सारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे ,हवालदिल झालेला मुजुर आता कुठे कामाला लागला होता.तोच अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ,करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये ता.१ डिसेंबर रोजी रात्री, अचानक झालेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्याच्या अन्नधान्याचे , संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे लहान मुले वयवृध्द व स्त्री-पुरुष मजुरांचा निवाऱ्याचा अन्नधान्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.याची शासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागातील मजुरांचे पंचनामे करून भरपाई देण्याची,व वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे ऊसतोड मजुरांची लहान मुले व वयवृध्द मजुरांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यासाठी प्राथमीक उपाययोजना म्हणून प्रत्त्येक साखर कारखान्याने फिरते अरोग्य पथक सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे ता.अध्यक्ष अर्जुनराव गाडे यांनी उसतोड कामगारांच्या प्रश्नावर प्रशासन व कारखानदार यांनी गांभीर्यपूर्वक विचार नाही केला तर आरपीआय आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.