loader
Breaking News
Breaking News
Foto

महापरिनिर्वाण दिना निमित्त हिवरे येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

हिवरे ता करमाळा येथे सविंधानाचे शिल्पकार महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी हिवरे येथील समाजमंदिर परिसरात सर्व समाजबांधवांनी एकत्र येत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सामुहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओहोळ ,दादा ओहोळ, हनुमंतओहोळ ,बापू ओहोळ, किरण ओहोळ, सोमनाथ सरवदे, सोमनाथ ओहोळ, सिध्दार्थ ओहोळ, बापू ओहोळ , कैलास खाडे, अंगणवाडी सेवीका उषा सरवदे , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डौले, ग्रामपंचायत शिपाई पप्पू वाघमारे, अंकुश माने, तानाजी खाडे ,बंडू लोकरे, उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान महापरिनिर्वाण दिना निमित्त जिल्हापरिषद शाळेत मुख्याध्यापक सुग्रीव निळ यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आले या वेळी सर्व शिक्षक व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts