loader
Breaking News
Breaking News
Foto

ओमायक्राॅन च्या धास्ती नंतर लसीकरणाचा वेग वाढला एकाच दिवसात ५०४० जणांनी घेतली लस!

आरोग्य विभागाकडून काल विक्रमी लसीकरण केले गेले असुन एकाच दिवसात पाचहजार चाळीस जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.कोर्टी १६३२, जेऊर ९०३,साडे, ६४१,वरकुटे, ६६२ केम,५७६, करमाळा कुटिर रुग्णालयात ५९६ जणांना लस देण्यात आली .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

संपुर्ण लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर लस घेण्या बाबत नागरिकांकडून उदासीनता दाखवली जात होती मात्र कोरोनाच्या दुसऱ्या नव्या ओमायक्रॉन चा धोका समोर आल्यांनतर लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला असून नागरिक पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अनेक जण पहिला डोस घेऊन बिनधास्त होते आरोग्य विभागाकडून लसीकरण कॅम्प आयोजित केले जात होते लस घेण्या बाबत जागृती केली जात होती मात्र नागरिक प्रतिसाद देत नव्हते. ओमायक्राॅन च्या धास्ती नंतर शासकीय कार्यालयात, बॅंकेत, प्रवसात दुसरा डोस झालेल्या सर्टिफ़िकेट बाबत सक्ती केली गेल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts