loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून शाळा-महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी तसेच बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तालुक्यातील किती विद्यार्थ्यांना याचा दिलासा मिळणार हे आकडेवारीवर सांगता येणार नाही मात्र राज्यभरातील अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने परीक्षा शुल्काच्या बाबतीत दिलेला दिलासा मोठा आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts