loader
Breaking News
Breaking News
Foto

आत्ता प्रत्येक शाळेत साजरी होणार वैज्ञानिकांची जयंती ! गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा स्तुत्य उपक्रम

बालवयातच विद्यार्थ्यांवर महापुरुषांचे विचार व त्यांच्या आदर्शाचे संस्कार होण्यासाठी प्रत्येक शाळेत सर्वच महापुरुषांची जयंती साजरी केली जाते त्यामुळे बालवयातच विद्यार्थ्यांवर महापुरुषांच्या कार्याचा ठसा उमटला जातो व त्यांना महापुरुषांची ओळख होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना बालवयातच वैज्ञानिकांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान व त्यांनी लावलेले शोध इत्यादीबद्दल जिज्ञासा,वैज्ञानिक दृष्टिकोन उपलब्ध होवुन वैज्ञानिकांबाबत कुतूहल निर्माण होईल व विज्ञान विषयाची अभिरुची निर्माण होईल त्यामुळे प्रत्येक शाळेत आत्ता महापुरुषांच्या बरोबरच वैज्ञानिकांच्या देखील जयंत्या साजऱ्या करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व मुख्याध्यापकांना केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

अठ्ठावीस वैज्ञानिकांचे पीडीएफ स्वरूपात फोटो व त्यांचे शोध कार्य व सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेतील एका भिंतीवर हे सर्व फोटो लावून "Science Wall" सायन्स वाॅल असे नाव देण्यात यावे व यासाठी लागणारा खर्च शाळा व्यवस्थापन निधी /१५ वा वित्त आयोग किंवा लोकसहभागातुन करण्याचे सुचविण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या "स्वच्छ शाळा सुंदर शाळा " उपक्रम अंतर्गत हा कार्यक्रम करण्या विषयी करमाळा पंचायत समितीच्या मासिक मिटिंग गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी हा ठराव मांडला यास सर्व सभागृहाच्या वतीने सभापती अतुल पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या नवोपक्रमाचे तालुक्यातुन कौतुक होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्ता अनेक वैज्ञानिक व शास्त्रज्ञांची ओळख होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts