loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत करा ,अन्यथा तिव्र आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा !

तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा ,तुर टाॅमेटो, मिरची, दोडका,व इतर फळबागांचे आतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्वाभिमानीने म्हटले आहे की कोरोना लॉकडाऊन काळात शेतमालाचे पडलेले दर यामुळे अधीच शेतकरी अडचणीत आहेत आणी आता आवकाळी पावसाने पार कंबरडे मोडून टाकले आहे.कोरोनाच्या सावटानंतर आता कुठेतरी शेतातील कांदा,डाळीब,टाॅमेटो, गहू ,केळी,हरभरा भाजीपाला ,तेलवर्गीय पिके.ईत्यांदी पिकांच्या माध्यमातून चार पैसे पदरात पडतील या आशेवर शेतकरी कष्ट करायला लागला होता.परंतु ह्या तीन दिवसांच्या.आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने.कुठलेही निकष न लावता सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन तिव्र आंदोलन करण्यात येईल.व अंदोलनात होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे.ता अध्यक्ष सुदर्शन शेळके. जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,ता युवा अध्यक्ष अमोल घुमरे ता पक्षाध्यक्ष बापू फरतडे बापू वाडेकर .ता उपाध्यक्ष तानाजी शिंदे. शाखा अध्यक्ष जातेगाव अशोक लवंगारे व शेतकरी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार विजय जाधव यांनी स्विकारले असून शेतकऱ्यांच्या भावना तात्काळ शासना पर्यंत पोहचवल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts