loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ,शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे साकडे शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदना द्वारे घातले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या निवेदनात माजी आमदार पाटील यांनी म्हटले आहे की राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका करमाळा तालूक्यासह माढा तालुक्यातील 36 गावांनाही बसला आहे तरी तात्काळ महसुल खात्याकडून पिकनुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तसेच करमाळा तालुक्यातील शेतकरी वीज संकटातून स्वतःला सावरत असताना आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्याने पहात आहे. शेतकर्‍यांना आता शासनाकडून आर्थिक मदतीची गरज असुन यासाठी महसुल तसेच कृषीविभागाने योग्य ती कार्यवाही सुरु करावी . रब्बी पिकांवर या पावसाचा परिणाम झाला असून ज्वारी, गहु, मका, तुर यासह कांदा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ जिरायत अथवा रब्बी पिकधारकांनांच बसला असे नसुन करमाळा तालुक्यातील ऊस व केळी उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

ऊसतोडणी चालू असल्याने तोडलेला ऊस पावसाच्या पाण्यामुळे शेतातील सरीत अडकुन बसला आहे. ऊस वाहतुक करुन कारखान्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता त्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. तर केळी या पिकावरही फार मोठे संकट आले आहे. आशिया खंडातील चांगल्या दर्जेदार केळीचा पट्टा म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या करमाळा तालूक्यातील या भागात आता अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे केळीचे भाव गडाडले असुन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन महसुल व कृषीविभागाने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे तयार करावेत. या नुकसानभरपाई बाबतचा अहवाल तातडीने वरीष्ठ कार्यालयास पाठवावा तरच आगामी काळात पिकनुकसानभरपाईस शेतकरी पात्र ठरतील. या नुकसानभरपाई साठी आपण पाठपुरावा करत असुन संकटकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts