loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा आगारास दोन कोटींचा फटका !लालपरीच्या भवितव्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. आगार प्रमुख आश्विनी किरगत यांचे कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन !

एस टी कर्मचारी संपामुळे करमाळा आगारास दिड ते दोन कोटींचा फटका बसला असल्याची माहिती आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना दिली असून आपली लालपरी पुन्हा डौलात धावावी, वाहकाच्या घंटीचा आवाज पुन्हा ऐकू यावा, पुन्हा आपले बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजावे, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचे व रुग्णाना दवाखान्यात पोहोचवण्याचे पुण्य आपल्याकडून घडावे, भाविक भक्तांना मंदिरात पोहोचवण्याचे भाग्य आपल्याला लाभावे आपल्या लालपरीच्या भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी कामावर हजर व्हा असे भावनिक आवाहन किरगत यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधिक माहिती देताना किरगत यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिनांक 28/10/21 पासून संप पुकारला आहे. दिनांक 7/11/21 पासून रा प करमाळा आगार या राज्यव्यापी संपात सामील झाले आहे. परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांनी पगारवाढ केली आहे. ती पगारवाढ देखील कामगारांना मान्य नसल्याने कामगार कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे लालपरी ची वाहतूक ठप्प आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आपली लालपरी खुप दिवसांपासून बंद आहे. संपापुर्वी दररोज 9-10 हजार प्रवासी करमाळा आगाराच्या बस मधून प्रवास करत होते. 61 बसेसच्या माध्यमातून दररोज सुमारे 190 फेऱ्या चालवल्या जात होत्या. सध्या आगारात फक्त आगार व्यवस्थापक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ,सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एवढेच जण हजर आहेत. इतर सर्व कर्मचारी गैरहजर आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आगाराने मालवाहतुकही सुरु केली होती. परंतु संपामुळे सगळंच ठप्प झालेलं आहे. विद्यार्थी, महिला आपल्याच माता - भगिनी, ज्येष्ठ नागरिक, दवाखान्याला जाणारे रुग्ण, देवदर्शनाला जाणारे भाविक हे सर्व जण आपल्या लालपरीने प्रवास करतात. सर्वांना लालपरीचा लाभ होतो. विलीनीकरणाच्या मुद्द्यामुळे संप वाढत आहे परंतु या संपामुळे राज्य परिवहन करमाळा आगारास जवळपास दीड - दोन कोटींचा फटका बसला आहे आणि हा फटका वाढतच आहे. आपली लालपरी पुन्हा डौलात धावावी, वाहकाच्या घंटीचा आवाज पुन्हा ऐकू यावा, पुन्हा आपले बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजावे, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचे व रुग्णाना दवाखान्यात पोहोचवण्याचे पुण्य आपल्याकडून घडावे, भाविक भक्तांना मंदिरात पोहोचवण्याचे भाग्य आपल्याला लाभावे,आपल्या लालपरीच्या भवितव्यासाठी आपण कामावर हजर व्हावे, असे आवाहन आगार प्रमुख आश्विनी किरगत यांनी केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts