loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी दोन महिन्याची मुदत द्या - बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी!

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी दोन महिन्याची मुदत द्या अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. महावितरण व सरकारला दिलेल्या निवेदनात सुपनवर यांनी म्हटले आहे की कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे.कुठल्याही शेतीमालाला भाव नव्हता केळी कांदा दुधाला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे खरीप पिके चांगली आली होती परंतु अतिवृष्टीमुळे पिकाचे नुस्कान झाली आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे गेला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शेतकऱ्यांचे ऊस कांदा तुरीही पिके शेतामध्ये उभी असून शेतकऱ्याकडे कुठल्याही पद्धतीचे उत्पादनाचे साधन नाही उसाचे बिल व तुरीचे पीक आल्यानंतर शेतकरी वीज बिल भरतील परंतु आता जर वीज कनेक्शनकट करून शेतकऱ्यांवर अन्याय करू नका 15 दिवस अगोदर नोटीसदेण्याची पद्धत आहे शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कनेक्शन कट करू लागलेले आहेत डीपी सोडू लागलेले आहेत पठाणी वसुली जर केलीतर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी अनिल तेली कैलास पवार गणेश इवरे भालचंद्र इवरे भागवत दुधे अण्णासाहेब शिंदे उमेश सरडे बाळू कोळेकर दादा ईटकर भीमराव येडे हनुमंत राऊत प्रकाश काळे बाळासाहेब मानेआधी जण उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महावितरण कडुन डिपी सोडवले गेल्याने वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही अनेक भागात उसतोड मजुर आले आहेत त्यांच्या देखील पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts