loader
Breaking News
Breaking News
Foto

पांडे येथील सुपुत्र व रायगड येथे कार्यरत असलेले पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार!

पांडे येथील सुपुत्र अशोक दुधे यांची काही दिवसांपूर्वी रायगड येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नियुक्तीनंतर पहिल्यांदाच गावी आल्याने पांडे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालया समोर भव्य नागरी सत्कारा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, उद्योजक राजेश दुधे, पत्रकार दस्तगीर मुजावर, माजी सरपंच नवनाथ दुधे, विकास भोसले, संपत कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पांडे गावातील 105 पोलिस कर्मचारी तसेच विविध पदांवर आधीकारी झाले आहेत. दुधे साहेबांच्या प्रेरणेतून गावातील युवकांना दिशा मिळाली आहे त्यांचा आदर्श घेवून युवकांनी स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करून अधिकारी होऊन गावाचे नाव लौकीक करण्याचे आवाहन संपत कुंभार यांनी केले .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी बोलताना पत्रकार दस्तगीर मुजावर म्हणाले की काही माणसं मोठी झाल्यानंतर आपला भुतकाळ विसरतात मात्र दुधे साहेब यांनी आपल्या गावाप्रती व मायभुमीचीअसलेली मायेची नाळ तुटू दिली नाही. आकाशाला गवसणी घातली तरी पाय मात्र जमिनीवर ठेवून वेळोवेळी गावासाठी सदैव मदतीचा हात देवुन आदर्श घालून दिला असल्याचे सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी आशोक दुधे यांनी गावातील युवकांना स्पर्धा परिक्षा विषयी मार्ग दर्शन केले. तसेच आपण ज्या शाळेत सातवी पर्यंत शिकलो त्या जिल्हा परिषद प्राथमीक शाळेची पहाणी केली व शाळे च्या काम साठी पाच लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच गावातील दिगंबररावजी बागल सार्वजनिक वाचनालयला भेट देऊन गावातील युवक अधिकारी घडावा म्हणून स्पर्धा परिक्षा व एम पी सी चे पुस्तके ऊपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . यावेळी राजेश दुधे,पत्रकार दस्तगीर मुजावर, ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, संपत कुंभार, वाचनालयाचे सचिव विकास भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts