loader
Breaking News
Breaking News
Foto

पुर्वभागातील खंडीत केलेला वीजपुरवठा पूर्ववत करा अन्यथा मंगळवारी रास्ता रोको- धरणग्रस्त संघनेचे अध्यक्ष सतिश निळ यांचा इशारा!

करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ चालू करावा अन्यथा मंगळवार दि.२३/११/२०२१ रोजी सकाळी गौडरे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी बार्शी यांच्या कडे निवेदनाद्वारे दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील शेतकरी बांधव यांचेवर वीज वितरण कंपनीने सातत्याने अन्यायच केला आहे. आत्ता धरणात पाणी आहे. तर शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित केलेला आहे .त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे ऊस व इतर पिकांचे नुकसान होणार आहे. रात्री अपरात्री कष्ट करून हातातोंडाशी आलेला घास काढून घेण्यासारखा वीज वितरण कंपनी चा प्रयत्न आहे. पाण्याअभावी उसाचे वजन घटणार आहे. तसेच अगोदरच गेल्या वर्षी पासून पूर्व भागांत फक्त आणि फक्त चारच तास वीज पुरवठा केला जात होता. मात्र बील आठ तासाचे आकारण्यात आलेले आहे. याशिवाय सिना कोळगाव प्रकल्पामुळे वाड्यावस्त्यावर राहणाऱ्या लोकांना व मुक्या जनावरांना पिण्यास ही पाणी मिळणार नाही. तसेच शेजारील परंडा तालुक्यातील वीज पुरवठा आठ तास चालू आहे, मग आमच्यावरच अन्याय का केला जातो.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तरी आपण ऊस तोडणी होऊन आम्हाला ऊस बील मिळे पर्यंत वीज पुरवठा खंडित करू नये व आम्हाला वीज बिल भरण्यास सवलत द्यावी.व ज्यांचे वीज कनेक्शन बंद केले आहे. त्यांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बांधव यांचे वतीने दिनांक २३/११/२०२१ रोजी सकाळी १० वाजता गौडरे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी हि विनंती. या निवेदनावर सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवर, नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे पाटील, , कोळगावचे माजी सरपंच भारत मामा चेंडगे , बिभीषण पवार, साबीर भाई शेख, रामभाऊ शिंदे, केशव बंडगर, आवाटी, मुकुंद पाटील,अशोक हानपुडे, माजी सरपंच गौडरे, आण्णा सपकाळ, नवनाथ घरबुडवे माजी सरपंच मिरगव्हान,अमोल फरतडे,हिवरे, संभाजी पाटील, माजी सरपंच, शेतकरी नेते वसंत आंबारे, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कर्मवीर मधुकरराव नीळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले हिसरेचे युवानेते,नवनाथ जगदाळे, संतोष जगदाळे, तात्यासाहेब जगदाळे, राजेंद्र जगताप, आजीनाथ जगताप,व पूर्व भागांतील शेतकरी बांधव यांच्या सह्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा. उपअभियंता वीज वि. कं. जेऊर, पोलीस निरीक्षक करमाळा.शाखा अभियंता,वीज वि.कं. साडे. यांना पाठविण्यात आल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts