loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या निवडी जाहीर , तालुकाध्यक्ष पदी नलिनीताई जाधव यांना दुसऱ्यांदा संधी !!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या निवडी जाहीर झाल्या असून तालुकाध्यक्ष पदावर पुन्हा एकदा नलिनीताई जाधव यांना संधी देण्यात आली आहे तर जिल्हाउपाध्यक्ष पदी नंदीनीताई लुंगारे,तालुका कार्याध्यक्ष पदी सौ.विजया कर्णवर, तालुका उपाध्यक्ष पदी सौ.अश्विनी मोहोळकरसौ.शितल घाडगे या नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ.सुप्रियाताई गुंड-पाटील यांनी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या निवडी करमाळ्याचे आमदार माननीय संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे पार पडल्या या वेळी तालुका सरचिटणीस पदी पुष्पा कर्चे, तालुका सचिव पदी सौ.माया कदम, तालुका उपसचिव पदी सौ.मेघा डेरे, उपकार्याध्यक्ष पदी सौ.स्वाती गायकवाड, उपसचिव पदी सौ.पुष्पा ताई थोरात आणि तालुका कार्यकारणी सदस्य पदी सौ.पल्लवी साखरे, सौ शोभा दुरंदे, सौ संगीता फरांडे यांच्या देखील निवडी करण्यात आल्या

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे शहराध्यक्ष शिवराज जगताप विधानसभा अध्यक्ष सुरवसे, तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय अडसूळ, राष्ट्रवादी युवक कांग्रेस सरचिटणीस गौरव झांजुर्णे, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, कार्यकारिणी सदस्य महेश काळे पाटील, महाराष्ट्र प्रदेश पदवीधर सदस्य नितीन झिंजाडे, युवती तालुका अध्यक्षा शितलताई क्षिरसागर,वक्ता सेल तालुका अध्यक्ष शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी नूतन जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी जोमाने काम करतील व महिला आघाडीचे वेगळा ठसा उमटवती असा आशावाद व्यक्त केला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts