loader
Breaking News
Breaking News
Foto

कोर्टी ते आवाटी रस्त्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्याचा भाजपा सरचिटणीस काकासाहेब सरडे यांचा इशारा!

कोर्टी ते आवाटी या राज्य महामार्गाचे दोनपदरी करणाचे काम सुरु असुन अतिशय ढिम्या गतीने हे काम सुरु आहे.काम रेंगाळल्याने संपूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे. विहीत वेळेत काम पुर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा अन्यथा तिव्र आंदोलन करु तसेच आमच्या मागणीकडे संबंधित कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा करमाळा तालुका भाजपा सरचिटणीस काकासाहेब सरडे यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना काकासाहेब सरडे म्हणाले की सध्या मकाई, भैरवनाथ, कमलाई तसेच माढा तालुक्यातील देखील कारखाने सुरु आहेत या रस्त्यावरुन हि वाहतूक होत आहे .रस्त्यावरुन जागोजागी पडलेल्या मोठ्मोठ्या खड्डयामुळे उस वाहतूक करणे जिकरीचे होत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच परवा झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे त्या मुळे दुचाकीस्वारांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करुन बुजवणे गरजेचे असताना मुरुम व मातीने बुजवले जात आहेत त्यामुळे उन्हाळ्यात प्रचंड धुळ व थोडा पाउस झाला तर चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. एन पी कन्स्ट्रक्शन च्या मनमानी कारभाराविरुद्ध मात्र संबंधित प्रशासन कारवाई करण्यात हलगर्जी करत आहे हे गौडबंगाल असल्याचे देखील सरडे यांनी सांगीतले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कोर्टी पासुन ते आवाटी पर्यंत चे सर्व खड्डे डांबरीकरण करुन बुजवावेत तसेच धुळीचा त्रास संपवण्यासाठी दिवसातुन पाच वेळा पाणी मारावे अन्यथा तिव्र आंदोलन करणार असून प्रशासाने आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts