loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुक्यातील 14 गावातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर ! गावपुढारी लागले तयारीला

ग्रामपंचातीच्या सदस्यांपैकी काही जागा सदस्याचे निधन,राजीनामा,सदस्यत्व रद्द अथवा इतर अन्य कारणामुळे रिक्त जागा झाल्या असतील अशा ग्रामपंचातीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील 14 गावातील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे" दरम्यान जिल्हापरिषद व पंचायत समिती निवणुकां तोंडावर असताना होणाऱ्या या पोटनिवडणूका रंगतदार होणार असल्याचे चित्र असून कार्यकर्त्यांमध्ये व गटामध्ये उत्साहाचे वातावरण तयार करण्यासाठी तालुका पातळीवरील नेत्यांकडून कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे.तसेच गावातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गावपुढारी देखील जोमाला लागणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. त्यानंतर मतदान हे 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तालुक्यातील अंजनडोह, देलवडी,हिवरे,हिंगणी,खडकी,लव्हे, रोशेवाडी ,टाकळी,तरटगाव, उंदरगाव, वरकटणे,वाशींबे, केतुर पांगरे या गावातील रिक्त जागांवर हि निवडणूक पार पडणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान तहसीलदार समीर माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts